शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा आवास योजनेचे २.४१ कोटी अडकले

By admin | Updated: May 7, 2016 01:48 IST

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने लाभार्थ्यांवर आत्महत्येची पाळी$$्पिरसवाडा : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सर्व ग्रामपंचायतीतील

एसटी प्रवर्ग : अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने लाभार्थ्यांवर आत्महत्येची पाळी$$्पिरसवाडा : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सर्व ग्रामपंचायतीतील हद्दीतील एस.टी. प्रवर्गासाठी सन २०१४-१५ मध्ये ५४१ घरकूल मंजूर झाले होते. त्यासाठी २ कोटी ४१ लाखांचा निधी प्राप्त झाला होता. तो वाटपही झाला व लाभार्थ्यांनी कामही केले. घरकुलाचे काम पूर्ण झाले. ५० टक्के रकमेवर दुकानदाराकडून साहित्य उधारी उसनवारी आणून पूर्ण केले. आज ना उद्या निधी मिळणारच, असे लाभार्थ्यांना वाटत होते. पण वर्षभराचा काळ लोटला, मार्च संपला पण एक रूपयासुद्धा आला नसल्याने लाभार्थ्यांची मोठीच पंचाईत झाली आहे.दुकानदार, मंज़ूर वर्ग, घरकूल लाभार्थ्यांच्या घराच्या चकरा मारत आहेत. लाभार्थी पंचायत समितीत जाऊन आपली चपल झिझवत आहेत. पण शासनाकडून निधीच प्राप्त नाही तर पैसे अधिकारी कुठून देणार. एससी प्रवर्गासाठी २५१ घरकूल व इतर १२३ मंजूर झाले होते. यांचा संपूर्ण निधी प्राप्त झाला, वाटपही झाले. पण एस. टी. प्रवर्गाचा निधी न मिळाल्याने लाभार्थी हतबल झाले आहेत. शासनाने या लाभार्थ्यांना व्याजासह निधी द्यावा, अशी मागणी गरीब दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत असलेल्या एस.टी. प्रवर्गातील लाभार्थ्यांनी केली आहे.खंडविकास अधीकारी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण कव्हरेजच्या बाहेर असल्याने प्रतिसाद मिळाला नाही. पण संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क केला असता निधी प्राप्त झाला नसून निधी येताच लाभार्थ्यांना देऊ. यासाठी वरिष्ठांनी मंत्रालयाशी संपर्क करणे गरजेचे आहे. काही पं.स. पदाधिकारी यांच्याशी संपर्क केला असता यात आम्ही काय करणार. पैशाची मागणी जि.प. ने केली असल्याचे सांगितले. सन २०१५-१६ चे घरकूल योजनेचे पैसे सरळ आर.टी.जी.एस. अंतर्गत मिळत असल्याने निधी सरळ त्यांच्या खात्यात मंत्रालयातून जमा होते. फक्त बिल टाकून कामे होत आहेत. लाभार्थ्यांना पण त्रास होत नाही.सन २०१४-१५ च्या निधीसाठी लोकप्रतीनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. ही बाब संपूर्ण जिल्ह्यात आहे. पालकमंत्र्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. (वार्ताहर)