शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियान

By admin | Updated: April 17, 2016 01:43 IST

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून राष्ट्रीय पंचायत दिनापर्यंतच्या कालावधीत....

इटखेडा : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून राष्ट्रीय पंचायत दिनापर्यंतच्या कालावधीत भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये १४ एप्रिल ते २४ एप्रिल २००६ पर्यंत ‘ग्राम उदय से भारत उदय’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने येथील ग्रामपंचायत कार्यालयात या अभियानाचा शुभारंभ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पमाला अर्पण व अभिवादन करुन करण्यात आला.सरपंच अस्मिता वैद्य यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सभापती उमाकांत ढेंगे, माजी सरपंच इंद्रदास झिलपे, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सुभाष देशमुख, पोलीस पाटील विकास लांडगे, ज्येष्ठ नागरीक विश्वनाथ गोठे, प्राचार्य पुंडलिक धोटे यांची उपस्थिती होती. ग्राम विकास अधिकारी मेश्राम यांनी या अभियानाची पार्श्वभूमी उपस्थितांना समजावून सांगितली. या निमित्याने उपस्थितांनी सामाजिक एकोपा वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगाने सामाजिक समता राखण्याची शपथ घेतली. या अभियानांतर्गत सामाजिक सलोखा वा अभिसरण कार्यक्रम, ग्राम किसान सभा, आदिवासी महिला सरपंच मेळावा, ग्रामसभेचे आयोजन व ग्रामसभेस पंतप्रधानांचे संबोधन ऐकविणे इत्यादी कार्यवाही अपेक्षित आहे. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य कुंता कोकोडे, सुशिला गोंडाणे, सदस्य चेतन शेंडे, सरिता सुखदेवे, तारा वैद्य, पुष्पा उके, सुषमा गोंडाणे, संगीता गोंडाणे, देवराम मडावी, विनोद ठाकूर, घनशाम गोठे, शोभा मडावी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)विजेचा लपंडावसडक अर्जुनी : सडक अर्जुनी, कोहमारा, वडेगाव, कोकणा/जमि., सौंदड परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्रीला वीज जाणे आता नित्याचीच बाब बनली आहे. लहान मुले व वयोवृद्ध व्यक्तींना या विजेच्या लपंडावाचा जास्त त्रास सहन करावा लागत आहे. (शहर प्रतिनिधी)