गोंदिया : कोरोनाचा संसर्ग पुन्हा जोमाने वाढू लागला आहे. आजघडीला ८१७ रूग्ण सकारात्मक असून आजपर्यंत १५९४४ जणांना कोरोना झाला आहे. यापैकी १४९३६ जण कोरोनामुक्त झाले आहे तर १९१ जणांचा बळी गेला आहे. आता कोरोनाची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागल्याने आताही ७८ कर्मचाऱ्यांची गरज येथील वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या कोविड सेंटरकरिता आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांची वाढ होत आहे. दररोज १०० च्या घरात नवीन रूग्ण येत आहेत. या रूग्णांच्या सेवेसाठी आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांचा स्टाफ वाढविणे आवश्यक आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचा आढावा घेतला असता ७८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची गरज असल्याची वास्तविकता पुढे आली आहे.
........................
एकूण बाधित रूग्ण- १५९४४
बरे झालेले- १४९३६
उपचार सुरू असलेले - ८१७
कोरोना बळी -१९१
..................
आवश्यक मनुष्यबळ
पद------------ आवश्यक मनुष्यबळ
वैद्यकशास्त्र तज्ज्ञ (एमडी)-०६
मेडीकल मायक्रोबायोलॉजीस्ट-००
इंटेन्सिव्हिस्ट-०४
एमबीबीएस-२०
बीएएमएस-०२
बीएचएमएस-१०
बीयूएमएस-००
स्टाफ नर्स-२०
प्रयोगशाळा तंत्रज्ञ-०४
कनिष्ट तंत्रज्ञ-०२
एएमएम-०० बेडसाईड सहाय्यक-१०
............
कोट
गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. सध्या असलेल्या मनुष्यबळात उत्तम काम सुरू आहे. परंतु रूग्णांची संख्या वाढली तर आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता भासेल. कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी त्वरित जाहिरात देण्यात येईल. आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता पडू नये यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.
-डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी