शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना चाचण्यांच्या संख्येत केली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 05:00 IST

कोरोनाची तिसरी लाट जिल्ह्यातून ओसरली असून, जिल्हा सध्या मागील काही दिवसांपासून कोरोनामुक्त झाला आहे. मात्र, मधेमधे काही प्रमाणात बाधित आढळून येत असल्याचे दिसते. यामुळेच कोरोना पूर्णपणे गेला नसल्याची प्रचिती येत राहते. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असल्याने आरोग्य विभागाकडून चाचण्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मध्यंतरी फक्त १०-२० चाचण्याच केल्या जात असल्याचेही दिसले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया  :  जिल्हा सध्या कोरोनामुक्त आहे. मात्र, देशातील काही भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता चाचण्यांची संख्या वाढविण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. अशात मध्यंतरी शंभराच्या आत असलेली चाचण्यांची संख्या आता वाढविण्यात आल्याचे दिसत आहे. शनिवारी (दि. १४) जिल्ह्यात १३२ चाचण्या करण्यात आल्या. मात्र, त्यात आता रॅपीड अँटिजन चाचण्यांचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. कोरोनाची तिसरी लाट जिल्ह्यातून ओसरली असून, जिल्हा सध्या मागील काही दिवसांपासून कोरोनामुक्त झाला आहे. मात्र, मधेमधे काही प्रमाणात बाधित आढळून येत असल्याचे दिसते. यामुळेच कोरोना पूर्णपणे गेला नसल्याची प्रचिती येत राहते. मात्र, परिस्थिती नियंत्रणात असल्याने आरोग्य विभागाकडून चाचण्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मध्यंतरी फक्त १०-२० चाचण्याच केल्या जात असल्याचेही दिसले. तसेच बहुतांश वेळा शंभराच्या आतच चाचण्या सुरू आहेत. असे असतानाच देशातील काही भागात कोरोना पुन्हा आपले पाय पसरत असल्याने शासनाने चाचण्याची संख्या वाढवून वेळीच निदान करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळेच की काय, शनिवारी चाचण्यांची संख्या १३२ दिसून आली. मात्र, यामध्ये फक्त ११ आरटी-पीसीआर असून, १२१ रॅपीड अँटिजन चाचण्या होत्या. 

जिल्ह्यात आतापर्यंत ५,१७,०६० चाचण्या - मार्च २०२० मध्ये जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला व तेव्हापासून सातत्याने कोरोना चाचण्या सुरू आहेत. सुरुवातीला फक्त आरटी-पीसीआर हीच एकमात्र चाचणी केली जात होती. मात्र, त्यानंतर रॅपीड अँटिजन चाचणीला परवानगी मिळाली व त्यासुद्धा सुरू झाल्या. आतापर्यंत जिल्ह्यात ५,१७,०६० चाचण्या करण्यात आल्या असून, यामध्ये २,७५,७४३ आरटी-पीसीआर, तर २,४१,३१७ रॅपीड अँटिजन चाचण्या आहेत. एवढ्या चाचण्यांनंतर जिल्ह्यात ४६,२१६ बाधित आढळून आले आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या