शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

संक्रांतीनिमित्त तीळ खरेदीसाठी वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 21:56 IST

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तीळाचे भाव थोडे वधारले दिसत असतानाही संक्रातीनिमित्त तीळ खेरीदासाठी बाजारात गर्दी दिसत आहे. तीळ-गुळाचे लाडू तयार करण्यासाठी तीळ-गुळाची खरेदी होत. ‘तीळ-गुळ खा व गोडगोड बोला’ ही म्हण संक्रातीसाठी प्रचलीत आहे.

ठळक मुद्देतीळाचे भाव वधारले : बाजारात ठिकठिकाणी लागली दुकाने

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तीळाचे भाव थोडे वधारले दिसत असतानाही संक्रातीनिमित्त तीळ खेरीदासाठी बाजारात गर्दी दिसत आहे. तीळ-गुळाचे लाडू तयार करण्यासाठी तीळ-गुळाची खरेदी होत.‘तीळ-गुळ खा व गोडगोड बोला’ ही म्हण संक्रातीसाठी प्रचलीत आहे. बाजारात तीळ दिसताच संक्रातीची आठवण येते व डोळ्यापुढे येतात ते तिळाचे लाडू. मात्र तीळाचे भाव चांगलेच उंचावलेले राहत असल्याने तीळाचे लाडू बनवितानाही बजेटवर नजर ठेवावी लागते. मात्र मागील काही वर्षापासून तिळाचे चांगले उत्पादन होत असल्याने तीळाचे भाव स्थिर दिसून येत आहे. परिणामी महिलांना संक्रांतीत दिलासा मिळाला आहे.संक्रात आली की तीळ-गुळ या दोन वस्तूंची खरेदी वाढते. आता मंगळवारी (दि.१५) संक्रांत आली असल्याने महिला व पुरूषांची बाजारात तीळ-गुळ खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. येथे दुकानांसोबतच बाजारात रस्त्यावर दुकानी लावून तीळ विकणारे विक्रेतेही ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात येतात. त्यांच्या घरचे उत्पादन किंवा ग्रामीण भागातून खरेदी करून शहरात विकण्यासाठी ते दुकान लावत असल्याचे दिसते.हाच प्रकार यंदाही बाजारात दिसून येत आहे. रस्त्याच्या कडेला दुकान लावून तीळ व गुळ विकले जात असून जागोजागी हातठेलेही दिसत आहेत. सध्या या विक्रेत्यांकडे खरेदी करणाऱ्यांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे. यंदा भाव थोडे वधारले असले तरिही संबंधांच्या गोडव्यांचा हा सण असल्याने लाडू तयार करून त्यांचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठीचीही तयारी दिसत आहे.तीळ १५० रूपयांपासूनगोंदियाच्या बाजारात सध्या पांढरे व काळ््या दान्याचे तीळ विक्रीला आले आहे. यात पांढरे तीळ १८० रूपये तर काळ््या दान्याचे तीळ १५० रूपये किलो दराने विकले जात आहे. शिवाय ५०-६० रूपये किलो दराने गुळ विकला जात आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीही तिळाचे दर २०-३० रूपये कमी होते अशी माहिती आहे. यंदा थोडे फार भाव वधारले असले तरिही वर्षातून एकदाच सण येत असल्याने तीळ-गुळ खरेदी सुरूच आहे.रेडिमेड पपडीही उपलब्धआजच्या युगात प्रत्येकच वस्तू किंवा पदार्थ रेडीमेड उपलब्ध असतानाच बाजारात तिळाची पपडीही रेडीमेड विकली जात आहे. धकाधकीच्या जीवनाच तिळ खरेदी करून त्याचे लाडू व पपडी तयार करण्यासाठी नोकरदार महिलांकडे तेवढा वेळ नसतो. त्यामुळे त्यांचा कल रेडीमेड पपडीकडे असतो. नेमकी बाब हेरून बाजारात रेडीमेड पपडी उपलब्ध करण्यात आली आहे.

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांती