१,५७३ हेक्टर क्षेत्र वाढले : चार तालुक्यांत मात्र लागवड क्षेत्रात घटदेवानंद शहारे गोंदियाभूगर्भातील जलस्तर व पिकांचे सिंचन क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने राज्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियानामुळे जिल्ह्यातील रबी पिकांचे क्षेत्र वाढल्याचे दिसून येते. यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे बांधांमध्ये पाणी कमी आहे. परंतु जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या कामांतून मोठाच लाभ झाला आहे. यावर्षी जिल्ह्यात रबी पिकांची लागवड सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा एक हजार ५७३ हेक्टर अधिक क्षेत्रात करण्यात आली आहे.जिल्ह्यात रबीचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार ६५० हेक्टर आहे. मात्र यावर्षी २८ हजार २२३ हेक्टरमध्ये पिकांची लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षी सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक म्हणजे २८ हजार ०४० हेक्टरमध्ये रबीची लागवड करण्यात आली होती. जिल्ह्यात डाळवर्गीय पिकांची लागवड सर्वाधिक झाली आहे. डाळीचे सर्वसाधारण क्षेत्र १४ हजार ८१० हेक्टर असताना यावर्षी २० हजार २५६.४० (१३६ टक्के) हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली आहे. रबी तृणधान्याचे क्षेत्र मात्र घटले आहे. सर्वसाधारण क्षेत्र २ हजार ९२० हेक्टर असताना १ हजार ९१६.२० (६५.६ टक्के) हेक्टरमध्येच लागवड करण्यात आली आहे. मका १९९ व इतर तृणधान्यांची ६ हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली आहे. गहू, मका, हरभरा व इतर पिकांचे क्षेत्र वाढले आहे. त्यातच लाख-लाखोळी, जवस, इतर तेलवर्गीय व भाजीपाला पिकांचे क्षेत्र घटले आहे.तिरोडा तालुक्यात सर्वाधिक रबी पीकगोंदिया तालुक्यात रबीच्या सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा दुप्पट म्हणजे ४,०५१ हेक्टर आणि अर्जुनी-मोरगाव येथे ४,२१४ हेक्टरमध्ये रबी पिकांची लागवड करण्यात आली आहे. देवरी तालुक्यात १,५१४ हेक्टरमध्ये पिकांची लागवड झाली आहे. रबीची सर्वाधिक लागवड तिरोडा तालुक्यात करण्यात आली आहे. तिरोडा तालुक्यात ८,२३३ हेक्टरमध्ये उन्हाळी धानासह इतर पिक घेतले जात आहे. मात्र आमगाव, गोरेगाव, सालेकसा व सडक-अर्जुनी येथे रबी हंगामाच्या सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा कमी लागवड करण्यात आली आहे.
जलयुक्त शिवार अभियानाने उन्हाळी लागवड क्षेत्रात वाढ
By admin | Updated: January 30, 2016 02:08 IST