शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आणखी सहा कन्टेन्मेंट झोनची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:27 IST

जिल्ह्यातील बाधितांची संख्या सोमवारी ५८१ बाधित निघाल्यानंतर क्रियाशील रुग्णसंख्या ४,८८८ झाली आहे. विशेष म्हणजे, मोठ्या संख्येत रुग्ण घरीच अलगीकरणात ...

जिल्ह्यातील बाधितांची संख्या सोमवारी ५८१ बाधित निघाल्यानंतर क्रियाशील रुग्णसंख्या ४,८८८ झाली आहे. विशेष म्हणजे, मोठ्या संख्येत रुग्ण घरीच अलगीकरणात असून, त्यांच्याकडून होत असलेल्या चुकांमुळे अन्य लोकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका जास्त असतो. अशात घरीच अलगीकरणात असलेल्या बाधितांवर लक्ष ठेवण्यासाठी व त्यांच्यापासून इतरांना धोका उद‌्भवू नये, यासाठी आता कंटेन्मेंट झोन तयार केले जात आहेत. शुक्रवारी (दि. ९) जिल्ह्यात एकूण २० कन्टेन्मेंट झोन होते. मात्र, बाधितांची संख्या वाढत असल्याने त्यात वाढ करून शनिवारी (दि. १०) ३, तर रविवारी ११ कन्टेन्मेंट झोन वाढविण्यात आले होते.

मात्र बाधितांची संख्या वाढतच चालली असून, घरीच अलगीकरणात असलेल्या बाधितांची संख्याही वाढत चालली आहे. यामुळे काही परिसरांमध्ये बाधित वाढताना दिसून येत आहेत. अशात सोमवारी (दि.१२) आणखी सहा कन्टेन्मेंट झोन वाढविण्यात आले आहेत. यानंतर आता जिल्ह्यातील एकूण कन्टेन्मेंट झोनची संख्या ४० झाली आहे.

-----------------------------

शहरात धोका वाढतोय

जिल्ह्यात सर्वाधिक बाधितांची संख्या गोंदिया शहर व तालुक्यात आहे. यातही शहरातील संख्या जास्त असल्याने आता शहरातील धोका वाढत चालला आहे. हेच कारण आहे की, शहरात आता दहा कन्टेन्मेंट झोन झाले आहेत. शनिवारी कालीबाडीत कन्टेन्मेंट झोन तयार करण्यात आले असतानाच आता बाजपेयी वॉर्डातही कन्टेन्मेंट झोन तयार करण्यात आले असून, येथे सात कोरोनाबाधित आहेत.

-----------------------------

एकच उपाय ‘घरी रहा-सुरक्षित रहा’

जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर रूप धारण करीत आहे. बाधितांची संख्या वाढत असतानाच कोरोनामुळे नाहक नागरिकांचा जीवही जात आहे. मात्र त्यानंतरही नागरिकांकडून गांभीर्याने घेतले जात नसल्याचे दिसत आहे. हीच परिस्थिती राहिल्यास येणारे दिवस कठीण राहतील. यामुळे आता तरी नागरिकांनी आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी ‘घरी रहा-सुरक्षित रहा’ या मंत्रावर अंमलबजावणी करण्याची गरज आहे.