शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

रजेगाव-काटी उपसा सिंचन लाभक्षेत्रात होणार वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 20:49 IST

रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्र वाढ करण्याच्या विषयासंदर्भात आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मंत्रालयात जसलंपदा सचिव चहल यांच्या उपस्थितीत संबधित अधिकाºयांची विशेष आढावा बैठक घेतली.

ठळक मुद्देयोजना : मंत्रालयात विशेष आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्र वाढ करण्याच्या विषयासंदर्भात आमदार गोपालदास अग्रवाल यांनी मंत्रालयात जसलंपदा सचिव चहल यांच्या उपस्थितीत संबधित अधिकाºयांची विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीत रजेगाव व काटी मायनरवर येत असलेल्या गावांना रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सिंचन करण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीत आमदार अग्रवाल यांनी रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेसह नवेगाव-देवरी उपसा सिंचन योजनेसाठी राज्यपालांची विशेष मंजूरी मिळाली असल्याचे सांगत योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात सिंचन विभाग ढिलाई करीत असल्याचे सांगीतले. तसेच तेढवा-सिवनी उपसा सिंचन योजनेच्या अंतीम टप्प्यात सुरू असलेल्या कामालाही लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी आमदार अग्रवाल यांनी सचिवांकडे केली. शिवाय डांगोरली येथे प्रस्तावीत बॅरेजसाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती आमदार अग्रवाल यांनी बैठकीत दिली.तसेच आता या बॅरेजला लवकरात लवकर मंजूरी मिळावी यासाठी महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या स्तरावर आवश्यक ते प्रयत्न करण्यासाठी आमदार अग्रवाल यांनी सचिवांना विनंती केली. बैठकीत आमदार अग्रवाल यांनी मांडलेल्या विषयांवरील चर्चेनंतर सचिवांनी प्रस्तावीत रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्राच्या विस्ताराला मंजुरी देत विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सुर्वे यांना निर्देश दिले. शिवाय अन्य विषयांवरही त्वरीत कारवाई करण्याबाबत संबंधीतांना निर्देश देण्यात आले.यामुळे तालुक्यातील महत्वपूर्ण योजनांना गती मिळून येणाºया वर्षात योजनांच्या लाभक्षेत्रात सुमारे २० हजार एकर पर्यंत वाढ होणार असल्याचा अंदाज आ. अग्रवाल यांनी व्यक्त केला.