शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी धान खरेदीची मुदत वाढवून द्यावी

By admin | Updated: June 19, 2015 01:25 IST

दरवर्षी प्रमाणे चालू हंगामातही महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनद्वारे सहकारी धान गिरणी, ...

सौंदड : दरवर्षी प्रमाणे चालू हंगामातही महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनद्वारे सहकारी धान गिरणी, सहकारी खरेदी विक्री संस्था व ईतर संस्थाद्वारे शासनाच्या आधारभूत किंमती नुसार रबी हंगामाची धान खरेदी करणे सुरु आहे. त्यामुळे धान खरेदी केंद्रांवर गर्दी वाढली असून ३० जून पर्यंत धानाचा काटा (खरेदी) करणे शक्य नसल्याने धान खरेदीची किंमत वाढविण्याची मागणी येथील सहकारी भात गिरणीचे अध्यक्ष रमेश चुऱ्हे यांनी केली आहे. खुल्या बाजारात धानाचे दर फारच कमी असल्याने तसेच शासनाने प्रति क्विंटल २५० रु. प्रोत्साहन राशी देण्याचे घोषीत केल्यामुळे शेतकरी उत्पादीत धान व्यापाऱ्याकडे न नेता सरळ मोठ्या प्रमाणात सहकारी धान खरेदी केंद्रावर नेत आहे. त्यामुळे धानाची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. परंतू पाहिजे त्या प्रमाणात बारदाना व गोदाम उपलब्ध न झाल्यामुळे जिल्हाभर खरेदी मंदगतीने सुरु आहे.शासनाने आधारभूत केंद्रावर धान खरेदीची मुदत ३० जून पर्यंत दिली आहे. परंतु सर्व शेतकऱ्यांचे धान दिलेल्या मुदतीत काटा करणे शक्य नाही. सौंदड केंद्रांतर्गत राका, पळसगाव, पिपरी, भदूटोला, फुटाळा, सावंगी, बोपाबोडी, घाटबोरी, खोडशिवनी, सिंदीपार, बिर्री, गिरोला, हेटी आदी गावातील धान खरेदी केंद्रावर येत आहे. तसेच या केंद्रांशी संलग्न ईतर गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विहिरी व बोअरवेल्स द्वारे मोठ्या प्रमाणात सिंचनाची व्यवस्था केल्यामुळे तसेच सिंचन व्यवस्था असल्यामुळे मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे सौंदड केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची आवक वाढली आहे. काही शेतकऱ्यांनी केंद्रावरील गर्दी बघता व पावसाच्या भितीने स्वत:चे घरीच धान साठवून ठेवले आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत सौंदड केंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांचे धान मोजमाप करणे शक्य नाही. करीता धान खरेदीची मुदत २० जुलै पर्यंत वाढविण्याची मागणी चुन्हे यांनी केली. (वार्ताहर)