शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदीची मुदत वाढवा

By admin | Updated: June 26, 2015 01:32 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून शासनाच्या आधारभूत हमी भावाने सडक अर्जुनी, डोंगरगाव/स.,

केंद्रांवर गर्दी : आदिवासी विविध कार्यकारी संस्थेची मागणीखजरी : सडक अर्जुनी तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून शासनाच्या आधारभूत हमी भावाने सडक अर्जुनी, डोंगरगाव/स., कनेरी, खजरी या धान खरेदी केंद्रावर रबी धानाचा पेरा उत्पादन जास्त आहे. त्या तुलनेत धान खरेदीची सुरूवात आदिवासी विकास महामंडळाने उशिरा केली. त्यामुळे धान खरेदी केंद्रावर गर्दी वाढली आहे. शासनाने धान खरेदीची मुदत ३० जून असल्याने खरेदी केंद्रावरील पडलेला शेतकऱ्यांचा धान काटा करणे शक्य नाही.शासनाने प्रतिक्विंटल २५० रुपये प्रोत्साहन राशी देण्याचे घोषित केल्याने खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढली. डोंगरगाव खरेदी केंद्रावर सात हजार ५९५ क्विंटल खरेदी झाली असून केंद्रावर शेतकऱ्यांचा चार हजार क्विंटल धान उघड्यावर पडून आहे. पावसामुळे नियमित काटा करणे शक्य नाही. संस्थेजवळील गोदाम खरीप हंगामातील धानाने भरले असल्याने रबी धान खरेदीसाठी जागा नाही. महामंडळाने खरेदी केलेला गोदामातील धान उचल केले नसल्याने उर्वरित उघड्यावर पडलेल्या धानाची खरेदी कशी करावी, असा प्रश्न संस्थांना पडला. महामंडळाने गोदामातील धानाची उचल करावी, अशी मागणी होत आहे. अनेक खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा धान पाण्यात भिजला असून शेतकऱ्यांची नुकसान झाले. तर काही शेतकऱ्यांनी पावसाच्या भीतीने घरीच धान साठवून ठेवले आहे. शासनाच्या दिलेल्या मुदतीत केंद्रावरील धान मोजणे शक्य नाही. तरी धान खरेदीची मुदत २० जुलैपर्यंत वाढवावी व खरेदी केलेला माल सोबतच उचल करावा, अशी मागणी डोंगरगाव संस्थेचे अध्यक्ष रमेश इळपाते, उपाध्यक्ष धनलाल परशुरामकर, मीताराम देशमुख व शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)