विजय रहांगडाले : ‘संस्कारांचे मोती’चे बक्षीस वितरण तिरोडा : विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धेच्या युगात टिकावे यासाठी विविध शिकवणी, कोचिंग क्लासेस पालक आपल्या पाल्यांसाठी लावून देतात. हे सर्व शहरात चालत असते परंतु अशा स्पर्धेतही या शाळेतील विद्यार्थी तालुक्यातून प्रथम येतात. त्यांचे कारण या शाळेची उपक्रमशिलता होय. संस्काराचे मोती या लोकमतच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ होते, असे मत आ. विजय रहांगडाले यांनी मांडले. भिमरावजी विद्यालय वडेगाव येथील संस्काराचे मोतीचे बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. बक्षीस वितरण आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते, सेवा सहकारी सोसायटी वडेगावचे अध्यक्ष तेजराम चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. अतिथी म्हणून भाऊराव कठाणे, बाबा भैरम, चंद्रकांत टेंभरे, योजीलाल ठाकरे, प्राचार्य ए.डी.पटले, पर्यवेक्षक एम.टी.सोनवाने उपस्थित साजरा करण्यात आला. यावेळी तेजराम चव्हाण अध्यक्षीय भाषणातून देशहीत महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास व शारीरिक विकास करून आपला सर्वांगिण करावा, असे सांगितले. प्राचार्य ए.डी.पटले यांनी संस्काराचे मोती हा उपक्रम लोकमतचा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूपच फायद्याचा असून त्यांना वाचनाची सवय लागते. नवनवीन उपक्रम, ज्ञान विद्यार्थ्यांना माहित होते. कार्यक्रमाचे आयोजक डी.आर.गिरीपुंजे यांनी आपल्या प्रास्ताविकातून लोकमत संस्काराचे मोती हा लोकमतचा उपक्रम विद्यार्थ्यांच्या कसा फायद्याचा आहे, हे सविस्तर सांगितले. संचालन बी.यु.बिसेन, आभार आर.बी.भांडारकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यानी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी) संस्काराचे मोती स्पर्धेचा प्रथम पुरस्कार तनुश्री भाष्कर, द्वितीय विवेक गिऱ्हेपुंजे, तृतीय महेक पटले यांना मिळाला. तसेच दहा विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण आ. विजय रहांगडाले यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.
लोकमतच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ
By admin | Updated: January 1, 2017 01:46 IST