शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

बसस्थानकावर गैरसोयी

By admin | Updated: August 30, 2015 01:41 IST

सहा महिन्यापूर्वी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते स्थानिक बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात झाला. मात्र अद्यापही येथे अनेक गैरसोयी आहेत.

जिल्हा मुख्यालयाशी संपर्क नाही : मंत्र्यांच्या हस्ते झाला होता स्थानकाचा शुभारंभअर्जुनी मोरगाव : सहा महिन्यापूर्वी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते स्थानिक बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात झाला. मात्र अद्यापही येथे अनेक गैरसोयी आहेत. बससेवेच्या माध्यमातून जिल्हा मुख्यालयाशी या तालुक्याची नाळ जुळलेली नाही. अख्ख्या राज्यात असा एकमेव तालुका असावा अशी शंका प्रवासी व्यक्त करीत आहेत.स्थानिक बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा १७ जानेवारी रोजी संपन्न झाला. सर्व सुविधायुक्त बसस्थानक राहील अशी मुक्ताफळे उधळण्यात आली. मात्र येथे अनेक गैरसोयी आहेत. बसस्थानकावर सुलभ शौचालय नाही. चौकशी नियंत्रण कक्षात दुरध्वनी नाही. एकाच कर्मचाऱ्याच्या भरवशावर नियंत्रण कक्षाचा कारभार सुरू आहे. उपहार गृह अद्यापही सुरू करण्यात आले नाही. आदिवासी व दुर्गम भागातील अनेक मोठ्या गावांसाठी थेट बससेवा उपलब्ध नाहीत. अशा नानाविध समस्या आहेत. बस आगाराची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मात्र या मागणीकडे लोकप्रतिनिधी व राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष आहे.गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुका वैविधतेने नटलेला आहे. या तालुक्यात राष्ट्रीय उद्यान आहे. इटियाडोह धरण आहे. शिवाय महाराष्ट्रात वास्तव्यास असलेली एकमेव तिबेटीयन वसाहत आहे. हा तालुका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असून वाहतुकीचे साधन म्हणून रेल्वे व बससुविधा आहे. रेल्वेने या तालुक्याची नाळ जुडलेली असली तरी बससेवेच्या बाबतीत हा तालुका संपर्क कक्षेच्या बाहेर आहे. या तालुक्यातील अनेक कर्मचारी दैनंदिन जिल्हा मुख्यालयात ये-जा करतात. मात्र सकाळच्या सत्रात रेल्वे व बससुविधा उपलब्ध नसल्यामुळे वळसा घालून साकोलीमार्गे १०० पेक्षा अधिक किलोमिटरचा प्रवास करवा लागतो. काही काळापूरती बससेवा उपलब्ध केली जाते मात्र अल्पावधीतच बंद केली जाते. कोहमारा ते अर्जुनी मोरगाव अशी दिवसभर फेरी घालणारी शटल बससेवा उपलब्ध झाल्यास प्रवाशांना सोईचे होऊ शकते. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी व गोरेगाव तालुक्याचा काही भाग येतो. या जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले सडक अर्जुनी तालुक्यातील आहेत. मात्र या ठिकाणी बससेवेचा थेट संपर्क नाही. या तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजोली (भरनोली) येथे केवळ दोन बसफेऱ्या आहेत. तर झाशीनगर व केशोरी येथे थेट बससेवा नाही. सकाळची महागाव-नागपूर बस बंद करण्यात आली. नागपूरसाठी केवळ प्रतापगड व लाखांदूर मार्गे एक फेरी आहे.बसस्थानकाला आठ महिन्याचा कालावधी झाला मात्र येथील समस्य अजूनही कायम आहेत. मंत्री नेहमीप्रमाणे भाषण देऊन मोकळे झाले मात्र जनतेला समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.(तालुका प्रतिनिधी)राजकारण्यांचे काय?१७ जानेवारी रोजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी अर्जुनी मोरगाव-यवतमाळ बससेवा सुरू करुन हिरवी झेंडी दाखविली. या कार्यक्रमात हजारो लोक उपस्थित होती. ही बस सेवाच महामंडळाने बंद केली. यापूर्वी या भागाचे आ. नाना पटोले हे होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात शिर्डी व पंढरपूर या लांब पल्ल्याच्या बससेवा अर्जुनी मोरगाव येथून सुरू केल्या होत्या. वर्षभराचे आतच या बससेवा बंद करण्यात आल्या. एकंदरित राजकारण्यांनी सुरू केलेल्या बससेवा क्षणिक असतात. अल्पवधीतच त्या बंद होतात हे कटूसत्य आहे. या पाठीमागे त्यांचा स्वार्थच असतो असा सूर सामान्य जनतेत उमटत आहे.