शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीमध्ये बोगस मतदारांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:07 IST

तिरोडा तालुक्यातील ग्रामपंचायत पिपरिया येथील ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदार यादीमध्ये बोगस मतदारांचा समावेश असल्याची बाब उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देगावकºयांची जिल्हा निवडणूक अधिकाºयांकडे तक्रार : बोगस यादी रद्द करा

लोकमत न्यूज नेटवर्कइंदोरा (बु.) : तिरोडा तालुक्यातील ग्रामपंचायत पिपरिया येथील ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदार यादीमध्ये बोगस मतदारांचा समावेश असल्याची बाब उघडकीस आली आहे. बोगस मतदारांचा समावेश असलेली यादी रद्द करुन नव्याने जाहीर न केल्यास होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकºयांनी दिला आहे.जे मतदार गावात ३० वर्षांपासून राहत नाही व ज्यांचे आधारकार्ड नाही. तसेच स्वस्त धान्य दुकानात यादीत नाव नाही. त्यांचीही नावे ग्रामपंचायत पिपरिया गावातील वार्ड क्र.३ च्या मतदार यादीमध्ये समाविष्ट आहेत. हा प्रकार गावातील नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी याची जिल्हा निवडणूक अधिकारी गोंदिया व तालुका निवडणूक अधिकारी तिरोडा यांच्याकडे तक्रार केली आहे. मतदार यादीतील घोळ दूर करण्याची मागणी केली आहे.पिपरिया येथील वार्ड क्र.३ च्या ग्रा.पं. मतदार यादीमध्ये २७८ मतदारांचा समावेश आहे. यात पुरुष १३३ व महिला १४५ असा समावेश आहे. या २७८ मतदारांमध्ये एकूण ४९ मतदार बोगस असल्याचा गावकºयांचा आरोप आहे. २५ ते ३० वर्षापासून या गावातच राहत नाही. त्या ४९ मतदारांच्या नावाचा समावेश वार्ड क्र.३ च्या मतदार यादीमध्ये केला आहे.शासनाच्या नियमानुसार गावातील नागरिकांनी बोगस नावावर पुराव्यासहित आक्षेप नोंदवून सुद्धा निवडणूक अधिकारी यावर कार्यवाही का करीत नाही.बोगस मतदार जे या गावातच राहत नाही याचा सबळ पुरावा सरपंच ग्रामपंचायत पिपरिया तसेच स्वस्त धान्य दुकानदार यांनी लेखी देऊन सुद्धा निवडणूक अधिकारी ग्रामस्थांची दिशाभूल करीत असल्याचा गावकºयांचा आरोप आहे. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी या प्रकराची गांभीर्याने दखल घेवून कारवाई करण्याची मागणी केली आहे.पडताळणी दरम्यान उघडकीस२८ आॅगस्ट २०१७ ला निवडणूक अधिकारी तिरोडा यांनी ग्रामपंचायतला मतदार यादी पळताळणीसाठी नोटीस बोर्डावर लावली. तेव्हा नागरिकांच्या लक्षात आले की वार्ड क्रमांक ३ मध्ये बोगस नावाचा समावेश आहे. गावातील नागरिकांनी या मतदार यादीवर आक्षेप घेऊन जिल्हा निवडणूक अधिकारी गोंदिया व तालुका निवडणूक अधिकारी तिरोडा यांना निवेदनाद्वारे माहिती दिली. ४९ बोगस मतदारांच्या नावांमध्ये ३४ मतदारांमध्ये बालाघाट, खैरलांजी व गोंदिया लोकांचा समावेश आहे. माजी सरपंच गोधन बसीने, मुन्नालाल लिल्हारे, विजय लिल्हारे यांनी यादीेवर आक्षेप नोंदविला.अन्यथा निवडणुकीवर बहिष्कारमागील लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, जि.प. व पं.स. निवडणूक मतदार यादीमध्ये बºयाच मतदारांची नावेच नव्हती. तर आता मात्र मतदार यादीत ३४ बोगस नावांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाने बोगस नावे वगळून नव्याने मतदार यादी जाहीर न केल्यास आगामी ग्रा.पं.च्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकºयांना दिला आहे.