शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

उद्‌घाटन झाले, मात्र धान खरेदीचा मुहूर्त मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:23 IST

गोरेगाव : रब्बी हंगामातील धान खरेदी करण्यासाठी विविध संस्थांद्वारे आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्‌घाटन आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले ...

गोरेगाव : रब्बी हंगामातील धान खरेदी करण्यासाठी विविध संस्थांद्वारे आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्‌घाटन आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आले आहे. मात्र, गोदाम आणि बारदानाअभावी धान खरेदीला सुरुवात करण्यात आली नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना व्यापारी व दलाल हाच पर्याय असून आपले धान त्यांना कमी दरात विक्री करावे लागत आहे.

अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या ग्राम तिल्ली, मोहगाव, चोपा, तेढा, मोहाडी, गिधाडी या गावांत विविध संस्थांची धान खरेदी केंद्रे सुरू झाली. परंतु, धान खरेदीचा मुहूर्त सापडला नाही. बारदानाअभावी केंद्रे पांढरा हत्ती ठरली आहेत. ग्राम कुऱ्हाडी व कवलेवाडा येथे धान खरेदी केंद्रे सुरू झाली. मात्र, बारदाना व गोदामाअभावी तेथेही खरेदी सुरू झाली नाही. चिचगाव येथील संस्थेद्वारे ढिवरटोली येथील धान खरेदी केंद्रात उपलब्ध जुना बारदाना असल्याने अंशत: खरेदी सुरू करण्यात आल्याचे बोलले जात आहे. धान खरेदी केंद्रावर शासकीय दराने किंमत शेतकऱ्यांना देण्यात येत असली तरी बारदाना व गोदामाअभावी खरेदीस सुरुवात केली जात नाही. त्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांना कमी किमतीत धान विकत आहेत.

एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विविध घोषणा करीत असले तरी या योजनांची अधिकारी अंमलबजावणी करीत नसल्याचे दिसते. खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात आधारभूत किमतीत धान खरेदी करण्यात आली. या धानाची उचल झाली नसल्याने गोदामे रिकामी झाली नाहीत. त्यामुळे जागेअभावी शेतकरी खरेदी-विक्री संस्थेला संस्थेमार्फत केंद्र उभारण्यासाठी वाट पहावी लागत आहे. दरम्यान, रब्बी धानाची खरेदी तत्काळ सुरू करण्यात यावी, आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.