शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
4
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
5
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
6
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
7
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
8
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
9
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
10
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
11
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
12
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
13
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
14
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
15
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
16
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
17
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
18
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
19
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस

बालक्रीडा संमेलन व पालक-शिक्षक मेळाव्याचे उद्घाटन

By admin | Updated: December 30, 2015 02:27 IST

जिल्हा परिषद स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ अंतर्गत पंचायत समिती अर्जुनी-मोरगावचे तालुकास्तरीय बालक्रीडा ...

५५० विद्यार्थी व ४५० शिक्षकांचा सहभाग : अनेक पाहुण्यांची अनुपस्थितीबोंडगावदेवी: जिल्हा परिषद स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ अंतर्गत पंचायत समिती अर्जुनी-मोरगावचे तालुकास्तरीय बालक्रीडा समेलन व पालक-शिक्षक मेळाव्याचे उद्घाटन पिंपळगाव/खांबी येथील क्रीडांगणावर स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाचा ध्वज फडकावून मोठ्या उत्साहात करण्यात आले. या चार दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष माजी आमदार दयाराम कापगते होते. पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर यांच्या हस्ते बजरंग बलीच्या प्रतिमेचे पूजन करून व स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करून थाटात उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पं.स.उपसभापती आशा झिलपे, जि.प. सदस्या कमल पाऊलझगडे, मंदा कुंभरे, उच्चश्रेणी खंड विकास अधिकारी नारायण जमईवार, पिंपळगावचे सरपंच प्रज्ञा डोंगरे, पंचायत समिती सदस्य प्रेमलाल गेडाम, पं.स. सदस्य नाना मेश्राम, रामलाल मुंगनकर, होमराय येरेटी, पं.स.सदस्य करुणा नांदगावे, शिशुला हलमारे, पिंगला ब्राह्मणकर, नाजुका कुंभरे, जिल्हा बँकेचे संचालक केवळराम पुस्तोडे, तालुका भाजपा अध्यक्ष रघुनाथ लांजेवार, बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेंडारकर, खरेदी-विक्री समितीचे अध्यक्ष नामदेव कापगते, गटशिक्षणाधिकारी स्वाती हवेले, शिक्षण विस्तार अधिकारी अहिल्या खोब्रागडे, तालुका सहकारी भात गिरणीचे उपाध्यक्ष होमराज ठाकरे, हिरालाल रामटके, डॉ. नाजुक कुंभरे, डॉ. वामन ब्राह्मणकर, डॉ. आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक वामन मेश्राम, नगरसेवक मुकेश जायस्वाल, अंबरदास कोरे, ग्रामसेवक तुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. तालुका बालक्रीडा महोत्सवात तालुक्यातील ११ केंद्रातील ८८ संघामधील ५५० विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच सहभागी झालेल्या ४५० शिक्षकांकडून मान्यवर अतिथींना सर्वप्रथम मानवंदना देण्यात आली. उद्घाटन सभारंभाप्रसंगी स्थानिक पिंपळगाव शाळा तसेच तावशी शाळेच्या विद्यार्थिनींनी रोमहर्षक नृत्य सादर करुन उपस्थितांकडून वाहवा मिळविली. पं.स. गटशिक्षणाधिकारी हवेले यांनी, प्राथमिक विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शारीरिक, बौद्धिक स्पर्धा अति आवश्यक असतात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुसंस्कृत घडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन प्रास्ताविकेतून केले.पंचायत समितीचे सभापती शिवणकर यांनी, शालेय विद्यार्थ्यांचे शरीर स्वास्थ्य, सुदृढ राहून त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करण्यासाठी तद्वतच विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कृतपणा निर्माण होण्यासाठी स्वदेशी खेळाची नितांत गरज आहे. १९३८ मध्ये निर्माण झालेला स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ आज गोंदिया व भंडारा जिल्ह्यात ताठमानानी उभे आहे. स्वदेशी खेळाला गावकऱ्यांचा पूर्ण पाठिंबा मिळत असल्याने गावागावांत स्वदेशी खेळाविषयी आत्मीयता वाढत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाची निश्चितपणे शासनस्तरावर नोंद घेतली जाईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी आ.कापगते यांनी, जि.प. शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थी सुसंस्कृत घडविण्यासाठी प्रयत्न करावे. जि.प. शाळेत आवश्यक त्या सर्व सुखसुविधा असतानाही विद्यार्थी शिकायला तयार नाही याचे आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. शिक्षकांनी आपला आदर्श विद्यार्थ्यांपुढे उभे करण्यासाठी काही तथ्ये पाळणे गरजेचे आहे. कमी पगार घेणाऱ्या शिक्षकांकडे विद्यार्थ्यांचा लोंढा जात आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. स्वदेशी मंडळाचे तालुका कार्यवाह लोंढे यांनी, खेळाडू व शिक्षकांना शपथ दिली. संचालन पी.के. लोथे यांनी केले. आभार मंडळाचे उपाध्यक्ष सी.टी. गभणे यांनी मानले. उद्घाटनीय सामना देऊळगाव व अरततोंडी शाळा यांच्यामध्ये झाला. महोत्सवासाठी मुख्या.एस.एस.मेश्राम, ए.आर. शहारे, डी.के. तागडे, एल.एच. मेश्राम सहकार्य करीत आहेत.