शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेत जिल्ह्यात ४९९८ बाधितांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 05:00 IST

आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाट येऊन गेल्या असून तिसरी लाट ओसरत असली तरी काही प्रमाणात ती आहे अशीच स्थिती आहे. सध्या जिल्ह्यात तिसरी लाट ओसरली असून आत फक्त १-२ बाधितांचीच नोंद घेतली जात आहे. तिसरी लाट सर्दी, खोकला व तापावरच राहिली असून बाधित घरच्या घरीच ठणठणीत झाले व त्यामुळे खूपच कमी प्रमाणात रुग्ण भर्ती झाले यात शंका नाही.

कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेनेही टेन्शन वाढविले होते व आता ती ओसरत आहे. १ जानेवारीपासून तिसऱ्या लाटेबाबत गणना सुरू करण्यात आली असून तेव्हापासून जिल्ह्यातील बाधितांची आकडेवारी बघितल्यास जिल्ह्यात आतापर्यंत ४९९८ बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. यात बाधितांमध्ये पुरुषांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाट येऊन गेल्या असून तिसरी लाट ओसरत असली तरी काही प्रमाणात ती आहे अशीच स्थिती आहे. सध्या जिल्ह्यात तिसरी लाट ओसरली असून आत फक्त १-२ बाधितांचीच नोंद घेतली जात आहे. तिसरी लाट सर्दी, खोकला व तापावरच राहिली असून बाधित घरच्या घरीच ठणठणीत झाले व त्यामुळे खूपच कमी प्रमाणात रुग्ण भर्ती झाले यात शंका नाही. मात्र तिसऱ्या लाटेतही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बाधितांची भर पडली हे सुद्धा टाळता येणार नाही. ३ मार्च पर्यंतची आकडेवारी बघितल्यास जिल्ह्यात तब्बल ४९९८ बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तिसऱ्या लाटेत कोरोनाने सर्वाधिक पुरुषांना झपाटले असून २७९९ त्यांची संख्या आहे. तर २१५६ महिलांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसते. आता कोरोनाची लाट ओसरली असून जिल्हा कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे. मात्र  जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्या लाटेने नक्कीच जिल्हावासीयांचे टेन्शन वाढविले होते. यात काहीच शंका नाही. 

 ७६ टक्के बाधित १८-६० वयोगटातील n तिसऱ्या लाटेतील बाधितांची संख्या जाणून घेतली असता ४९९८ बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. मात्र यामध्ये सर्वाधिक बाधित १८-६० वयोगटातील असल्याचे दिसत आहे. या वयोगटातील ३७८६ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती व त्यांची ७५.७५ एवढी टक्केवारी आहे. विशेष म्हणजे,या लाटेत चिमुकल्यांना धोका राहणार असे सांगितले जात असतानाच जिल्ह्यात ०-५ वयोगटातील ३९ चिमुकल्यांची नोंद घेण्यात आली असून त्यांची ०.७८ एवढी टक्केवारी आहे. 

१२ मृत्यूंची नोंद- तिसऱ्या लाटेच्या १ जानेवारी ते ३ मार्चपर्यंतच्या कालावधीत १२ मृत्यूंची नोंद घेण्यात आली आहे. मात्र, मरण पावलेल्या या रुग्णांना सहव्याधी असल्याने त्यांचा मृत्यू झाला असून, त्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले जात आहे. यामुळे मृत्यू कोरोनामुळे झाला हेच समजले जात असून, मृतांचा आकडा वाढला आहे.

२५ जानेवारी धोक्याची - तिसऱ्या लाटेत जानेवारी महिन्यातच सर्वात जास्त कहर दिसून आला व त्यानंतर फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यानंतर लाट ओसरताना दिसली. मात्र, जानेवारी महिन्यातील ३ दिवस सर्वाधिक धोक्याचे दिसून आले. कारण या ३ दिवसांतच सर्वाधिक बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. यात २१ जानेवारी रोजी ३६३ बाधित, २२ जानेवारी रोजी ३२० बाधित, तर २५ जानेवारी रोजी सर्वाधिक ३६४ बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. यामुळेच २५ जानेवारी हा दिवस सर्वाधिक धोक्याचा ठरला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या