शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

जिल्ह्यात एकाच गावातील 62 जनावरे लम्पीने आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2022 22:08 IST

जिल्ह्याच्या सर्व सीमा पशुधनासाठी सील करण्यात आल्या होत्या. बैल बाजार भरविण्यावर बंदी आणण्यात आली होती. सर्व जनावरांचे बाजार पशू प्रदर्शने,आंतर राज्यामधील व राज्यातील जिल्ह्यांतर्गत गोवंशीय व महिष वर्गीय पशुवाहतूक,बैलगाडा शर्यती यावर बंदी घालण्यात आली आहे. गोंदिया तालुक्यातील रायपूर या एकाच गावात लम्पीची जनावरे आढळली. यात ६२ पैकी ४४ जनावरे लम्पी मुक्त झालीत. १५ जनावरांवर उपचार सुरू आहे. ३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  राजस्थान, पंजाब, गुजरातसह आता महाराष्ट्रातही लम्पी दाखल झाला. गोंदिया जिल्ह्यांमध्ये पशुधनाला त्वचा रोगाचा प्रादुर्भाव फक्त एका गावात झाला. गोंदिया तालुक्यात असलेल्या आणि मध्यप्रदेशच्या बाॅर्डर असलेल्या रायपूर या एकाच गावात लम्पीने ६२ जनावरे आजारी पडलीत. यात तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे. लम्पी या रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यांमध्ये पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना,खबरदारी करण्याबाबत सूचना वरिष्ठ स्तरावरून पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता खबरदारीच्या सूचना पशुसंवर्धन विभागाने आपल्या अधिनस्थ यंत्रणेला दिल्या होत्या. महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, जळगाव, अहमदनगर, धुळे, लातूर, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, परभणी, नाशिक या १९ जिल्ह्यामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला होता. आता हळूहळू राज्यभर लम्पी पसरला आहे.  गोंदियाच्या पशुसंवर्धन विभागाने गोंदियाला अलर्ट केले होते. जिल्ह्याच्या सर्व सीमा पशुधनासाठी सील करण्यात आल्या होत्या. बैल बाजार भरविण्यावर बंदी आणण्यात आली होती. सर्व जनावरांचे बाजार पशू प्रदर्शने,आंतर राज्यामधील व राज्यातील जिल्ह्यांतर्गत गोवंशीय व महिष वर्गीय पशुवाहतूक,बैलगाडा शर्यती यावर बंदी घालण्यात आली आहे. गोंदिया तालुक्यातील रायपूर या एकाच गावात लम्पीची जनावरे आढळली. यात ६२ पैकी ४४ जनावरे लम्पी मुक्त झालीत. १५ जनावरांवर उपचार सुरू आहे. ३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. 

मध्यप्रदेशातून लागण तर झाली नाही ना?महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या वैनगंगा नदीच्या काठावर रायपूर हे गाव आहे. या गावातील जनावरे नदीवर पाणी पिण्यासाठी जात असताना त्या ठिकाणी लागण तर होऊन जनावरे इकडे तर आली नाहीत ना असा संशय व्यक्त केला जात आहे. 

 उपचारापेक्षा प्रतिबंध महत्त्वाचालम्पी त्वचारोगामध्ये जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके,मान,पाय,कास आदी ठिकाणी गाठी येतात तसेच तोंडात घशात व श्वसननलिका,फुप्फुसात पुरळ व फोड येतात. जनावरांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ गळती होते. जनावरांना अशक्तपणा येतो व भूक मंदावते. डोळ्यांमध्ये जखमा तयार होतात. या रोगामुळे गाभण जनावरांमध्ये गर्भपात होऊ शकतो. हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये,याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये,याकरिता आवश्यक ती काळजी घ्यावी.

३३०७ जनावरांना लस- देवरी या गावात ६५२ पैकी ६५० जनावरांना लस देण्यात आली. दोन जनावरे गरोदर असल्याने त्यांचे लसीकरण झाले नाही. रायपूरच्या पाच किमी अंतरात येणाऱ्या गावातील जनावरांची संख्या ३ हजार ३०७ आहे. या जनावरांना ३ हजार ४५० लस देण्यात आल्या आहेत.

अशी घ्या खबरदारीबाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्याची व्यवस्थित स्वच्छता ठेवावी. आजार सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा,योग्य जैवसुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी,बाधित जनावरांवर तत्काळ व योग्य उपचार केले आणि अबाधित क्षेत्र शंभर टक्के लसीकरण केले तर,या रोगावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येते.

 

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोग