वनमंत्र्यांचे आश्वासन : पदाधिकाऱ्यांनी घेतली सुधीर मुनगंटीवार यांची भेटावेगावबांध : महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे जावून राज्याचे वित्त, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मंत्रालयातील कक्षात जावून भेट घेतली व आपल्या समस्या मांडल्या. मुनगंटीवार यांनी त्यांच्या समस्या तत्परतेने सोडविण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी प्रामुख्याने वनरक्षक व वनपाल यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याच्या मागणीवर वन मंत्री सकारात्मक असल्याचे दिसले. त्यांनी बैठकीत उपस्थित सचिव, उपसचिव व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, १५ दिवसांत याबाबत अहवाल सादर करण्यात यावे. येत्या एक महिन्यात सदर समस्या मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणे कर्मचाऱ्यांना गणवेश भत्ता देण्यात यावे, अकारण बदली करू नये, वन पाल पदाची सरळ भरती घेण्यात येवू नये, एकस्तर पदोन्नती लागू करण्यासह आहार भत्ता, दर महिन्यात १० तारेखपर्यंत वेतन देण्यात यावे, ज्येष्ठता सूची दरवर्षी प्रकाशित करण्यात यावे व प्रत्येक वनविभागात गस्ती गथक तयार करण्याची मागणी आहे.याप्रसंगी वन मंत्र्यांसह संघटनेचे पदाधिकारी विजय मेहर, चंद्रकांत कांबळे, सुनील बोंडीवाले, प्रविण डोंगरवार, गाजी शेख, ए.के. निमगडे, एस.पी. मंडीक, राजू लड़के, राजेश पिंपलकर, शंकर तोंबर्लावार, आर.एच. पवार, सुनील फुलझेले, पी.एम. रासकर, डी.आर. भोसले आदी उपस्थित होते.(वार्ताहर)
वन कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत होणार सुधारणा
By admin | Updated: July 26, 2016 01:38 IST