शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भूलथापांना बळी न पडता चूक सुधारा

By admin | Updated: June 27, 2015 02:23 IST

निवडणुकीच्या प्रसंगी मोठी आश्वासने द्यावी, स्वप्न दाखवावे आणि सत्तेत आल्यानंतर त्या सर्व गोष्टी विसरणे, ...

प्रफुल्ल पटेल : सत्तारूढ सरकारवर हल्लाबोलगोंदिया : निवडणुकीच्या प्रसंगी मोठी आश्वासने द्यावी, स्वप्न दाखवावे आणि सत्तेत आल्यानंतर त्या सर्व गोष्टी विसरणे, भाजपाला चांगलेच जमले आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या २०० व ५० रुपयावरही भाजपाने डल्ला मारला. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसुद्धा देण्यात आली नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत दिशाभूल करुन सत्ता काबीज करुन घेतली. आता तरी भूलथापांना बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मतदार करून यापूर्वीची चूक सुधारा, असे आवाहन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक प्रचार दौऱ्यात गोरेगाव व सडक अर्जुनी तालुक्यात आयोजित सभांना ते संबोधित करीत होते. ओबीसी विद्यार्थी आज अडचणीत आला आहे. सहा लाखापर्यंतची क्रिमीलियर मर्यादा भाजपा सरकारने चार लाखापर्यंत केली. असे असले तरी निवडणुकीपुरते मर्यादा वाढ करण्याच्या बोंबा मारत आहेत. शेतकऱ्यांच्या धानाच्या भावात वाढ व्हायला पाहिजे होती ती उलट कमी केली. अनुदान जाहीर केले, पण देणार केव्हा? याचा अर्थ हे सरकार शेतकऱ्यांचे नाहीच. ही बाब सांगण्यासारखी असून आपसूक समजण्यासारखी आहे, हे देखील उघडपणे दिसून येते. म्हणून लोकसभेत केलेली चूक आता पुन्हा करू नका. जिल्हा परिषद व पंचायत समिती या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता द्या, आम्ही निश्चितपणे तुमच्या पाठीशी राहू, अशी ग्वाही खा.प्रफुल्ल पटेल यांनी दिली.(जिल्हा प्रतिनिधी)