शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल दुनियेतही टपालाचे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 21:46 IST

संदेश वहनाची अनेक साधने उपलब्ध झाली असली तरी टपालचे महत्त्व आजही टिकून आहेत.

ठळक मुद्देटपाल विभाग फायद्यातच : टेलिग्राम व अंडरपोस्टिंग सेवा बंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संदेश वहनाची अनेक साधने उपलब्ध झाली असली तरी टपालचे महत्त्व आजही टिकून आहेत. पोस्टकार्ड व आंतरदेशीकार्ड वगळता सर्व टपाल सुरुच आहेत. टपाल वाहतुकीचे काम मात्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. इंटरनेट व मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला असला तरी टपालाचे महत्त्व कायमच आहे.पूर्वीच्या काळी भावनात्मक दृष्ट्या एकमेकांना जवळ आणण्याचे काम पोस्टाचे पत्र किंवा आंतरदेशीकार्ड करायचे. पोस्टमन कधी येईल याची प्रतीक्षा नागरिकांना असायची. नातेवाईकांनी पाठविलेले पत्र डाक कार्यालयात आले का याची शहानिशाही अनेकदा करायचे किंवा त्या पत्राच्या प्रतीक्षेत लोक असायचे. परंतु आता संदेश वहनाची कामे मोबाईलचे एसएमएस, फोन, व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेल, फेसबुक, टिष्ट्वटर या माध्यमातून केले जातात. डाक विभागाचे संदेश वहन म्हणजे पोस्टकार्ड व अंतरदेशीकार्ड आता संदेशासाठी विक्रीला जात नाही. मात्र टपालचे महत्त्व कमी झाले असे मुळीच नाही.पूर्वीच्या तुलनेत लोक शिक्षित झाले आहेत. आजच्या काळात ९० टक्के लोक सुशिक्षित असल्यामुळे आपला व्यवहार करताना पोस्टाचा आधार घेतात असे अधिकाºयांचे म्हणणे आहे. सर्व बँकांचे एटीएम, महत्त्वाची कागदपत्रे, चेकबुक किंवा कोणतेही कागदपत्रे पोस्टाच्याच माध्यमातून पाठविण्यात येतात. संदेश वहनाची इतकी साधने उपलब्ध नव्हती, त्यावेळी दिवसाला १०० पोस्ट पत्रके पाठविली जात असली तर आता ५०० पोस्ट पत्र आता एकाच दिवशी पाठविले जात आहेत. यात एका दिवसात ४०० पत्राने वाढ झाली आहे. आता एलआयसीचे सर्व कागदपत्र पोस्टाच्याच माध्यामातून जात आहेत.सन २०१० मध्ये सरकारने केलेल्या मुल्यमापनात महाराष्टÑाची डाकसेवा १०७ कोटींच्या फायद्यात होती. आधुनिकीकरणाबरोबरच आताही महाराष्टÑ पुढे आहे. डाकविभागाचे काम वाढले आहे. परंतु सन १९८२ पासून भरती झाली नसल्याने मनुष्यबळाचा अभाव डाक विभागाला जाणवत आहे. शहराचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु पोस्टमन वाढविण्यात येत नाही.डाक विभागाने वेळेनुसार वर्षभरापूर्वी टेलीग्राम व दोन वर्षापूर्वी अंडर पोस्टींग सेवा बंद केली आहे. असे असतानाही डिजिटल दुनियेत टपालचे महत्व आजही कायम आहे.