शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गंगाबाईतील रक्तपेढी बंद करण्याची नामुष्की

By admin | Updated: April 16, 2016 01:13 IST

येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात असलेली जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तपेढी तेथील आरोग्य प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे

एफडीएची कारवाई : आरोग्य प्रशासनाचा हलगर्जीपणागोंदिया : येथील बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात असलेली जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्तपेढी तेथील आरोग्य प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी बंद करण्याचा आदेश दिला. पुढील आदेशापर्यंत या रक्तपेढीतून रक्त देण्यास आणि तिथे रक्त संकलन करण्यास मनाई केल्यानंतर गंबाबाई रुग्णालयाच्या आरोग्य प्रशासनाची चांगली धावपळ उडाली. ही गोष्ट अनेक रुग्णांच्या जीवावर बेतणारी असल्यामुळे अखेर धावपळ करीत पुन्हा एफडीए आयुक्तांच्या परवानगीने ही रक्तपेढी सुरू करण्यात आली.अनेक वर्षात पहिल्यांदाच अशा पद्धतीने रक्तपेढी बंद करण्याची नामुष्की ओढवल्यामुळे गंगाबाई रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या रक्तपेढीसारख्या महत्वाच्या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच नियुक्ती देण्यात आलेले डॉ.बजारे दि.४ पासून सुटीवर असताना त्यांच्या अनुपस्थितीतच रक्त संकलन आणि रक्त पुरवठा सुरू होता. अशातच दि.६ एप्रिलला अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे तपासणी केली असता तेथील कारभार चव्हाट्यावर आला. एफडीए अधिकाऱ्यांच्या अहवालावरून या विभागाच्या आयुक्तांनी रक्तपेढी बंद ठेवण्याचे आदेश दिले. मात्र रुग्णांचे हाल पाहिल्यानंतर पुन्हा डॉ.सुवर्णा हुबेकर यांना रक्तपेढीची जबाबदारी सांभाळण्याची सूचना जिल्हा शल्य चिकित्सकांनी केली. त्यानंतर आयुक्तांनी परवानगी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)