शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित मुलांना आणले शिक्षणाच्या प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 21:13 IST

भटकंती व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या पालकांची भेट घेवून त्यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा उपक्रम शिक्षण विभागातर्फे राबविला जात आहे. या अंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तावशी खुर्द परिसरात वास्तव्य करणाºया पाच मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले.

ठळक मुद्देगटसाधन केंद्र अर्जुनी मोरगावचा उपक्रम : शैक्षणिक साहित्याचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कइसापूर : भटकंती व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या पालकांची भेट घेवून त्यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा उपक्रम शिक्षण विभागातर्फे राबविला जात आहे. या अंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तावशी खुर्द परिसरात वास्तव्य करणाºया पाच मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले.गटसाधन केंद्र पंचायत समिती अर्जुनी मोरगाव येथील विषय साधन व्यक्ती शनिवारी (दि.५) शाळा भेटीला जात असताना तावशी (खुर्द) येथील रस्त्याच्या कडेला फोटो फ्रेम विकणारे वाशीम जिल्ह्यातील सात आठ कुटुंब पाल ठोकून वास्तव्यास असलेली आढळली. तिथे जावून चौकशी केली असता ७ ते १४ वयोगटातील ५ मुले आढळली.त्यांची विचारपूस केली असता त्यांची व पालकांची शिक्षणाविषयी आवड दिसून आली. विषय साधन व्यक्ती यु.एम.पडोळे व त्रिवेणी रामटेके यांनी जि.प.शाळा तावशी येथील मुख्याध्यापिका गभणे व जिल्हा परिषद हायस्कुल अर्जुनी मोरगाव येथील मुख्याध्यापिका कावळे यांच्याशी संपर्क साधला.तसेच या मुलांची तात्पुरती शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यास सांगितले.त्यांनी याला लगेच सहमती दर्शविली. त्यानंतर याची माहिती गटशिक्षणाधिकारी एन.जे.सिरसाटे यांना देऊन या पाचही मुलांना शाळेत प्रवेश देऊन शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात आली. या पाच मुलांपैकी आदित्य रवि धुर्वे व सुमित तोडसे यांना जिल्हा परिषद हायस्कुल अर्जुनी मोरगाव येथे इयत्ता ७ वी तर आकाशी रवि धुर्वे इयत्ता पहिली, शिवानी विजय धुर्वे इयत्ता ४ थी व शिवम विजय धुर्वे याला इयत्ता दुसरीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तावशी येथे प्रवेश देण्यात आला.या वेळी या पाचही विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शिक्षणाचा अधिकार अधिनियम ७ ते १४ वयोगटातील एकही मुल शाळाबाह्य व शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केले जाते.या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गट साधन केंद्रातील विषय साधन व्यक्ती यु.एम.पडोळे, त्रिवेणी रामटेके, सत्यवान शहारे, आर.डी. पातोडे, व्ही.जी. मेश्राम, सी.जे. ढोके, मुख्याध्यापिका गभणे, नवखरे, जिल्हा परिषद हायस्कुलच्या मुख्याध्यापिका कावळे, शिक्षक धनपाल शहारे, खोटेले यांनी सहकार्य केले.