शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

सर्व रुग्णालयाचे त्वरित फायर ऑडिट करा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:29 IST

गोंदिया : कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज आहे, तसेच आरोग्य सुविधेत वाढ ...

गोंदिया : कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज आहे, तसेच आरोग्य सुविधेत वाढ करून रुग्णांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे. रुग्णालयाचे फायर, इलेक्ट्रिकल व स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.

विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शुक्रवारी (दि.३०) त्या प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आल्या असता त्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी यंत्रणेला सूचना केल्या. या दौऱ्यात त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, प्राणवायू निर्मिती प्लांट, जिल्हा क्रीडा संकुल येथील कोविड रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, जिल्हा आरोग्य

अधिकारी डॉ. नितीन कापसे, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड आदी उपस्थित होते. जिल्हाभरात कोविड केअर सेंटरमध्ये ९२२ खाटा उपलब्ध असून, त्यापैकी ३२५ खाटा ऑक्सिजनच्या आहेत. जिल्हा क्रीडा संकुल येथे शंभर खाटांचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल उभारण्यात आल्याची माहिती दिली.

..........

लसीकरणात जिल्ह्याची आघाडी

लसीकरणामध्ये जिल्ह्याचे काम चांगले असून, जिल्ह्याला कोविशिल्ड लसीचे ३ लाख ८८ हजार २० व कोव्हॅक्सिन लसीचे २ लाख

२३ हजार २१०, असे एकूण ६ लाख ११ हजार २३० डोस प्राप्त झाले. आतापर्यंत ५ लाख ७५ हजार ८५८ व्यक्तींनी लस

घेतली आहे. पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ४ लाख ५७ हजार ५७९, तर दोन्ही डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या

१ लाख १८ हजार २८८ आहे. जिल्ह्यात सध्या दहा क्रियाशील रुग्ण असून, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.१९ टक्के, तर रिकव्हरी रेट ९८.२३ टक्के आहे.

.......

कुशल मनुष्यबळाची आवश्यकता

तिसऱ्या लाटेची तयारी करण्यात आली असून, पेडियाट्रिक वार्डसुद्धा सज्ज ठेवण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तिसऱ्या लाटेसाठी वैद्यकीय सुविधा अद्ययावत करण्यात येत असून, प्राणवायू प्रकल्पनिर्मितीवर भर देण्यात येत आहे. ऑक्सिजन बेड वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.

............

आशा वर्कर यांचा योग्य सन्मान करा

कोविडकाळात आशा वर्कर यांनी उत्कृष्ट काम केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांनी निदर्शनास

आणून दिले असता कोरोनाकाळात आशा वर्कर यांनी सर्वच ठिकाणी चांगले काम केल्याचे नमूद करून आशा वर्कर खऱ्या

कोरोना योद्धा आहेत असे लवंगारे म्हणाल्या. सर्व आशा वर्कर यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्याच्या सूचना केल्या.

.........