शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकट काळात आयएमएचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:30 IST

गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांची सीमा लागून आहे, तर गोंदिया येथे दर्जेदार आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध असल्याने लगतच्या मध्यप्रदेशातील ...

गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांची सीमा लागून आहे, तर गोंदिया येथे दर्जेदार आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध असल्याने लगतच्या मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण सध्या गोंदिया येथील विविध रुग्णालयात दाखल आहेत. एकूण रुग्णालयाच्या बेडपैकी सद्यस्थितीत ३० टक्के बेड हे बालाघाट जिल्ह्यातील रुग्णांनी भरले आहेत. जिल्ह्यातही कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. खा. प्रफुल्ल पटेल व प्रशासनाकडून आता रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा झाल्याने इंजेक्शनची फारशी समस्या नाही. मात्र, ऑक्सिजनची समस्या कायम आहे. जिल्ह्यात मागील चार ते पाच दिवसांपूर्वी ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाला होता. आ. विनोद अग्रवाल यांनी माजी मंत्री गौरीशंकर बिसेन यांच्याशी चर्चा केल्यानंतर ५० ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करुन देण्यात आले होते. दरम्यान, मध्यप्रदेशातील कोरोना बाधित रुग्ण गोंदिया जिल्ह्यात दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशात या रुग्णांवर उपचार करण्याची तयारी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने केली आहे. मात्र, यासाठी मध्यप्रदेश सरकारने नियमित ५० ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा जिल्ह्याला करण्याची विनंती केली आहे. यामुळे रुग्णांवर उपचार करण्यास मदत हाेणार आहे. दरम्यान, संकटाच्या काळात आयएमएने घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे.

.........

दररोज ६५० जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची गरज

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढत आहे. यात गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे जिल्ह्यात दररोज ६५० ऑक्सिजन सिलिंडर लागत असून, ५०० सिलिंडरचा पुरवठा केला जात आहे. यामुळे १५० सिलिंडरचा तुटवडा कायम आहे. अशात लगतच्या बालाघाट जिल्ह्याने नियमित ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केल्यास रुग्णांवर उपचार करण्यास मोठी मदत होणार असल्याचे आयएमएचे अध्यक्ष डॉ. विकास जैन यांनी सांगितले.

........

बालाघाटच्या जिल्हाधिकाऱ्यांची हिरवी झेंडी

बालाघाट जिल्ह्यातील ३० टक्के रुग्णांवर सध्या गोंदिया जिल्ह्यात विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र, यात ऑक्सिजनची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे बालाघाट जिल्ह्याने दररोज ५० ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा गोंदिया जिल्ह्याला करावा, यासंदर्भात बालाघाटचे जिल्हाधिकारी दीपक आर्य यांच्याशी चर्चा केली. त्यांनीसुध्दा याला हिरवी झेंडी दाखविली. तसेच आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन आयएमएचे अध्यक्ष डॉ. विकास जैन यांना दिले.

.......