शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अवैध प्रवासी वाहतूक एसटीच्या मानगुटीवर

By admin | Updated: April 17, 2016 01:39 IST

केशोरी-नवेगाव (बांध) या मार्गावरील टाईमबार झालेल्या काळी-पिवळी टॅक्सी विना परवाना अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्यामुळे ....

परिवहन महामंडळाला लाखोंचा फटका: प्रवाशांचा जीव धोक्यातकेशोरी : केशोरी-नवेगाव (बांध) या मार्गावरील टाईमबार झालेल्या काळी-पिवळी टॅक्सी विना परवाना अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या साकोली आगाराला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. या प्रकरणास काही प्रमाणात राज्य परिवहन मंडळ आणि पोलीस यंत्रणा कारणीभूत असल्याचे बोलल्या जाते. केशोरी- नवेगावबांध या मार्गावर चालणाऱ्या टाईमबार झालेल्या काळी-पिवळी जीप गाड्या प्रवाशांना कोंबून बिनधास्त चालत आहेत. परिवहन मंडळाच्या बसेस मात्र विना प्रवासी खाली जात असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे परिवहन मंडळाला लाखो रुपयांचा फटका बसत आहे. परवानाधारक जिपगाड्यांनी वाहतुकीच्या परवान्यानुसार प्रवासी भरुन नेले तरी एसटीच्या उत्पन्नावर फारसा फरक पडणार नाही. परंतु विना परवाना जिप गाड्या सुद्धा प्रवासी जेवढे मिळतील तेवढे कोंबून भरुन नेताना दिसत आहेत. परिणामी राज्य परिवहन मंडळाच्या उत्पन्नावर निश्चितच फरक पडत आहे. मात्र या गंभीर बाबीकडे परिवहन मंडळातील वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. यावर पोलीस विभाग निर्बंध घालू शकतो. परंतु चिरीमिरीच्या लालसेपोटी अवैध प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. अवैध वाहतुकीच्या प्रवासाला बळी पडून प्रवासी वेळेअगोदर पोहोचण्याच्या घाईमुळे काळी-पिवळी गाड्यांतून प्रवास करुन जीव धोक्यात टाकत आहेत. मात्र या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे परिवहन मंडळाला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. याकडे पोलीस विभागाने लक्ष दिले तर परिवहन मंडळाच्या उत्पन्नात निश्चितच भर पडल्याशिवाय राहणार नाही. (वार्ताहर)