शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी नसलेल्या शेकडो वाहनांतून अवैध वाहतूक

By admin | Updated: August 6, 2014 23:54 IST

जिल्ह्यात पुन्हा एकदा काळीपिवळी प्रवासी जीपगाड्यांनी धुमाकूळ सुरू केला आहे. परिवहन विभागाच्या आशीर्वादाने जिल्ह्यात जवळपास ७०० काळीपिवळी जीपगाड्यांद्वारे प्रवासी वाहतूक सुरू आहे.

गोंदिया : जिल्ह्यात पुन्हा एकदा काळीपिवळी प्रवासी जीपगाड्यांनी धुमाकूळ सुरू केला आहे. परिवहन विभागाच्या आशीर्वादाने जिल्ह्यात जवळपास ७०० काळीपिवळी जीपगाड्यांद्वारे प्रवासी वाहतूक सुरू आहे. मात्र त्यापैकी केवळ २०० च्या आसपास गाड्यांनीच ‘फिटनेस सर्टिफिकेट’ घेतले आहे. परवाना न घेताच भंगाराच्या काढण्यासारख्या गाड्या बेधडकपणे धावत असल्यामुळे दररोज शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे.अडीच वर्षांपूर्वी तिरोडा तालुक्यात काळीपिवळी जीपला झालेल्या भीषण अपघातात १९ प्रवाशांचा बळी गेला होता. त्या अपघातानंतर जिल्ह्यात काळीपिवळी प्रवासी वाहतुकीवर कडक निर्बंध लावले होते. जर प्रवासी वाहतूक करायची असेल तर परवान्यात नमूद केल्याप्रमाणे (पाच अधिक एक) प्रवासी भरावे लागतील, असे सांगून त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. केवळ पाच प्रवाशांना घेऊन जाणे परवडणारे नसल्यामुळे नंतर वर्षभर काळीपिवळी गाड्या बंद होत्या. मात्र नंतर घरगुती वापराच्या गाड्यांसाठी मिळणाऱ्या परवान्याप्रमाणे प्रवासी गाड्यांनाही ९ अधिक १ प्रवासी वाहतुकीचा परवाना मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. अखेर नागपूर परिक्षेत्रातील सर्व काळीपिवळी गाड्यांना ९ अधिक १ चा परवाना देण्यात आला. परंतू गेल्या काही महिन्यात काळीपिवळी चालकांनी यापेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाण्याचा सपाटा लावला आहे. गाडीत कितीही प्रवासी कोंबा, पण गाडीच्या बाहेर कोणीही लटकू नका, असे सांगत काळीपिवळी चालकांना देण्यात आलेली सूट पाहता कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही दिवसात काळीपिवळी जीप व इतर प्रवासी वाहनांची संख्या बरीच वाढली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना आता या काळीपिवळी वाहनांनी व्यापून टाकले आहे. प्रत्येक रहदारीच्या मार्गावर काळापिवळा रंग दिलेली प्रवासी वाहने धावताना दिसतात. गोंदिया शहरात तर या गाड्यांमध्ये प्रवाशांना घेण्यासाठी चढाओढ लागलेली असते.त्यातूनच ही वाहने भरधाव वेगाने निघतात. आधीच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले जातात. त्यातच भरधाव वेगाने गाडी हाकण्याच्या प्रकारामुळे वाहन अनियंत्रित होऊन अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिवहन व पोलीस विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अवैध प्रवाशी वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)