शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विटांची अवैध वाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 22:19 IST

परिसरात मातीपासून तयार केलेल्या विटांची मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाहतूक सुरु आहे. गावपातळीवरील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याचे विटांच्या अवैध वाहतुकीकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे.

ठळक मुद्देमहसूल विभागाचे दुर्लक्ष : कारवाईची मागणी

आॅनलाईन लोकमतबोंडगावदेवी : परिसरात मातीपासून तयार केलेल्या विटांची मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाहतूक सुरु आहे. गावपातळीवरील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याचे विटांच्या अवैध वाहतुकीकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे.बोंडगावदेवी परिसरात मातीपासून तयार केलेल्या विटांचा व्यवसाय जोरात सुरु आहे. मागील काही वर्षापासून विटांच्या वाहतुकीला परवानगी जरी लागत नसली तरी मात्र मातीपाूसन विटा तयार करण्याचा परवाना आवश्यक आहे. विटा तयार करताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन मातीची परवानगी काढण्याची प्रक्रिया विटा व्यावसायीकांना पूर्ण करणे गरजेचे असते. बोंडगावदेवी परिसरात मातीपाूसन विटा तयार करण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असून तहसील कार्यालयाकडून आवश्यक परवाना काही व्यावसायीकांनी मिळविला नसल्याची माहिती आहे. ग्रामीण भागात कार्यरत असलेले महसूल विभागाच्या कर्मचाºयांचे विटा व्यावसायीकांसोबत साटेलोटे असल्यामुळे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. मात्र यामुळे महसूल विभागाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. एका आठवड्यापूर्वी बोंडगावदेवी येथील विटा भरुन वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर एका तलाठ्यांनी पिंपळगाव-खांबी येथे सकाळी ९ वाजेच्या दरम्यान पकडला.मुख्य रस्त्यावर पकलडेल्या विटा भरलेल्या ट्रॅक्टर चालकास मातीपाूसन विटा तयार करण्याचा परवान्याची मागणी केली असता त्या ट्रॅक्टर चालकांनी त्यावेळी कोणतेही दस्तऐवज दाखविण्यास तत्परता दाखविली नाही. मुख्य रहदारीच्या रस्त्यावर विटा भरलेला ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला लावल्याचे दृश्य अनेकांनी पाहिले. विटाची वाहतूक करताना संबंधित ट्रॅक्टर चालकाकडे मातीपासून विटा तयार करण्याचा परवाना बाळगणे आवश्यक आहे. विटा भरुन वाहतूक करणाºया ट्रॅक्टर चालकाकडे कोणताही दस्तऐवज नसताना संबंधीत तलाठ्यांनी मोक्यावर केलेली कारवाई मात्र गुलदस्त्यातच आहे. त्या ट्रॅक्टरवर कारवाई झाली की नाही याची माहिती तहसील कार्यालयालात सुद्धा उपलब्ध नाही. साटेलोटे असल्यामुळे मातीपासून विटा तयार करण्याचा परवाना ट्रॅक्टर चालक बाळगत नसताना सुद्धा त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. ज्या दिवशी तलाठ्यांनी पिंपळगाव येथे ट्रॅक्टर अडविला त्या दिवसापर्यंत मातीपासून विटा तयार करण्याचा परवाना परिसरातील विटा व्यावसायीकांनी हस्तगत केला नव्हता असे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.