शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रालगतचा रेतीचा अवैध साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 21:23 IST

तालुक्यातील चुलबंद नदी पात्रातील रेतीचे उत्खनन करुन अवैध रेती साठा नदीपात्रालगत जमा करुन ठेवला जात होता.याप्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार बाम्हणी सडक येथील महेंद्र चंद्रिकापुरे यांनी संबंधित विभागाकडे केली होती.

ठळक मुद्देमहसूल विभागाचे दुर्लक्ष : रेतीमाफिया सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : तालुक्यातील चुलबंद नदी पात्रातील रेतीचे उत्खनन करुन अवैध रेती साठा नदीपात्रालगत जमा करुन ठेवला जात होता.याप्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार बाम्हणी सडक येथील महेंद्र चंद्रिकापुरे यांनी संबंधित विभागाकडे केली होती. त्यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोहळीटोला चिखली येथील रेती साठा जप्त केला. त्यानंतर या रेती साठ्याचा रविवारी (दि.६) लिलाव करण्यात आल्याची माहिती आहे.या रेतीसाठ्याची लिलाव प्रक्रिया थांबवून चौकशी करुन अवैध उत्खनन करणाºयावर कारवाही करण्याची मागणीही चंद्रिकापुरे यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील चुलबंद नदी पात्रातील रेतीचे अवैध उत्खनन रात्रीच्या वेळेस करुन त्याची तस्करी केली जात होत होती. तसेच रेतीमाफीया दिवसा नदी पात्रातील रेतीचा उपसा करुन तो नदीपात्रालगत ढिग तयार करुन ठेवीत होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास या रेतीची तस्करी केली जात होते. पिपरीघाट, सौंदड, राका या घाटावर हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू होता. या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत होता. याबाबतची तक्रार संबंधित विभागाकडे करुन सुध्दा त्यांनी याची दखल घेतली नव्हती. विशेष म्हणजे नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणात अवैध रेतीसाठा जमा करुन ठेवण्यात आला असताना त्याची साधी चौकशी करण्याचे धाडस सुध्दा या विभागाच्या अधिकाºयांनी दाखविले नव्हते. तर तक्रारीनंतर सदर रेतीसाठा जप्त करुन ती लावारीस दाखविण्यात आली. तालुक्यातील सर्व रेती घाटांची पाहणी करून तिथे जमा करुन ठेवण्यात आलेल्या अवैध रेतीसाठ्याची चौकशी करुन दोषीवर कारवाही करुन दंड वसुल करण्याची मागणी चंद्रिकापुरे यांनी केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाकडे दुर्लक्षजिल्ह्यातील अवैध रेती तस्करीच्या प्रकाराला पूर्णपणे आळा घालण्याठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी बैठक घेवून एक समिती गठीत केली होती. तसेच रेती तस्करीच्या प्रकाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारीे व कर्मचाºयांवर कारवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र यानंतरही हा प्रकार सुरूच असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र आहे.तपासणी नाक्याचे काय?रेती तस्करीला आळा घालण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर दक्षता समित्या व काही ठिकाणी तपासणी नाके सुरू करण्यात येणार होते. मात्र जिल्ह्यात रेती तस्करीचा प्रकार सुरूच असल्याने या तपासणी नाक्याचे काय झाले असा सवाल उपस्थित केला जात आहे.