शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कनेरी तलावात अवैध मुरुम उत्खनन

By admin | Updated: July 26, 2014 02:21 IST

तहसील कार्यालयातून रॉयल्टी न घेता कनेरी/केशोरी येथील

पुर्नचौकशी होणार : अर्जुनीच्या तहसीलदारांनी घेतली दखलअर्जुनी/मोरगाव : तहसील कार्यालयातून रॉयल्टी न घेता कनेरी/केशोरी येथील तलावातून हजारो ब्रास अवैध मुरुम काढण्यात आल्याचे वृत्त आहे. या मुरुमाचा पुरवठा दिनकरनगर ग्रामपंचायत व केशोरी येथील गरजू ग्रामस्थांना करण्यात आल्याचे समजते. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.प्राप्त माहितीनुसार, तुकुमनारायण येथील गट नं.१२५ मधील ५० ब्रास मुरुमाची रॉयल्टी स्थानिक तहसील कार्यालयातून काढण्यात आली. ही रॉयल्टी एका बड्या कंत्राटदाराने आपल्या हाताखाली काम करणाऱ्या इसमाच्या नावाने काढली. या रॉयल्टीची मुदत ८ ते १६ जुलै या कालावधीसाठी होती. या ठिकाणी काही ब्रास मुरुमाचे उत्खनन करण्यात आले. मात्र रॉयल्टी नसतानाही कनेरी तलाव गट नं. १३७ मधून मोठ्या प्रमाणावर अवैध मुरुमाचे उत्खनन करण्यात आले. हे उत्खनन ८ ते १२ जुलैपर्यंत जेसीबी मशीन लावून करण्यात आले. सुमारे १० ते १५ ट्रॅक्टरद्वारे या अवैध मुरुमाचा पुष्पनगर अ व ब व दिनकरनगर ग्रामपंचायत तसेच केशोरी येथील खासगी ग्राहकांना पुरवठा करण्यात आला. याद्वारे लाखो रुपयांची कमाई करण्यात आल्याचे समजते. या अवैध खोदकामामुळे तलावात मोठे खड्डे पडल्याचे दिसते. यासंदर्भात तहसीलदार संतोष महाले यांच्याशी चर्चा केली असता या प्रकरणाची तक्रार भ्रमणध्वनीद्वारे प्राप्त झाली. तलाठ्याकडून चौकशी अहवाल मागीतला आहे. चौकशी अहवाल शंकास्पद असल्याने पूनर्चौकशीचे आदेश देण्यात आले. दोषी कर्मचारी व संबंधित कंत्राटदाराची गय केली जाणार नाही. यासंदर्भात स्वत: चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)