शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे होतेय दुर्लक्ष : पॉझिटिव्हच्या संपर्कातील सहा जणांची चाचणीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:30 IST

गोंदिया : कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला. मार्च महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ...

गोंदिया : कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मार्च महिन्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला. मार्च महिन्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दीड हजारावर गेला. बाधितांचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यात आले. मात्र ट्रेसिंग फार कमी प्रमाणात होत असल्याने कोरोना संसर्गात वाढ होत असल्याचे बोलले जाते. जिल्ह्यात एका रुग्णामागे ८ जणांचे ट्रेसिंग केले जात आहे. तर रुग्णसंख्या वाढल्याने आता हे प्रमाण एका रुग्णामागे १५ करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १० खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. मात्र, खासगी प्रयोगशाळांकडून वेळीच माहिती उपलब्ध होत नसल्याने ट्रेसिंग करण्यास अडचण निर्माण होत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या पाच ते सहा जणांची चाचणी होत नसल्याने ते इतरांच्या संपर्कात येत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा तीन आकडी पाढा सुरू झाला आहे. याला प्रतिबंध लावण्यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंगवर भर देण्याची गरज आहे.

...............

दररोज दीडशे जण पॉझिटिव्ह, चाचण्यांच्या संख्येत वाढ

- जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आलेख सातत्याने वाढत आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले असून, दररोज दोन हजारांवर चाचण्या होत आहेत. यातील किमान दीडशे जण दररोज पॉझिटिव्ह येत आहेत.

- कोरोनाबाधितांचा वाढता ग्राफ लक्षात घेता आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण एका रुग्णामागे १५ असे करण्यात येऊन त्यांची चाचणी करण्यात येणार आहे.

- ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव वाढल्याने आता ग्रामीण भागातसुद्धा कठोर उपाययोजना आणि टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

.........

कोट :

जिल्ह्यात मागील पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीत कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. सध्या दररोज दोन हजारांवर चाचण्या केल्या जात आहेत. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाणसुद्धा वाढविण्यात येणार आहे.

- डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी

..........

हा घ्या पुरावा

- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झाशीनगर गावात एकाच दिवशी तब्बल ३६ रुग्णांची नोंद झाली. यापैकी दोन रुग्ण हे इतरांच्या संपर्कात आले; पण त्यांचे ट्रेसिंग वेळीच न झाल्याने कोरोना संसर्गात वाढ झाली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगकडे दुर्लक्ष केल्याने आणि माहिती लपविल्यानेसुद्धा या ठिकाणी कोरोना संसर्गात वाढ झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे ट्रेसिंगवर अधिक भर देण्याची गरज आहे.

.....

- शहरातील छोटा गोंदिया परिसरातील एका रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला. या रुग्णाच्या संपर्कात २० ते २५ जण आले. पण, त्यापैकी सात ते आठ जणांचीच कोरोना चाचणी करण्यात आली. संपर्कात आलेल्या उर्वरित १० ते १२ जणांची चाचणीच करण्यात आली नसल्याचे समजते आहे. परिणामी, कोरोना संसर्गात वाढ होण्यास मदत होत आहे.

......

एकूण कोरोना रुग्ण :

गृह विलगीकरणातील रुग्ण :

सध्या उपचार घेत असलेले :

कोरोनाचे एकूण बळी :