शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाप्रसादाच्या नोंदणीकडे ‘एफडीए’ची डोळेझाक

By admin | Updated: September 1, 2016 00:19 IST

गणेशोत्सवाच्या काळात मंडळांकडून होत असलेल्या महाप्रसाद वितरणासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणे...

अन्य विभाग सक्रिय : एफडीएचे मात्र मौनगोंदिया : गणेशोत्सवाच्या काळात मंडळांकडून होत असलेल्या महाप्रसाद वितरणासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणे आणि त्यांच्या नियमानुसार महाप्रसाद वितरण करण्याचे आदेश आहेत. मात्र या आदेशाची अंमलबजावणी करण्यात खुद्द हा विभागच उदासीन दिसत आहे. याबाबतची माहिती देणारे किंवा आवाहन करणारे कोणतेही पत्रक या विभाग अद्याप काढलेले नाही.अन्य विभागांकडून मंडळांना परवानगी व नोंदणीचे आवाहन केले जात असताना अन्न व औषध प्रशासनाकडून अद्याप तरी काहीच कळविण्यात आलेले नाही. साधे पत्रक काढून मंडळांना आवाहन करण्याची तसदी आतापर्यंत घेतली गेलेली नाही. यातून विभागाचे गोंदिया जिल्ह्याकडे किती लक्ष आहे याची प्रचिती येते. गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणपती उत्सव मंडळांकडून भाविकांसाठी महाप्रसाद वितरण केले जाते. ग्रामीण भागातून येणाऱ्या भाविकांसाठी या महाप्रसादाचा मोठा आधार होतो. मात्र महाप्रसादातून कित्येकदा विषबाधेचेही प्रकार घडत असल्याचे दिसून येते. अशात मात्र महाप्रसाद वितरण करणारे मंडळ आपले हातवर करतात. असले प्रकार घडू नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे मंडळांना नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र याबाबत आजवर अन्न व औषध प्रशासनाकडून ना जाहीरात ना पत्रकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. परिणामी गणपती उत्सव मंडळांकडून आपल्या मर्जीने महाप्रसाद वाटपाचे पुण्य कमाविले जाते. विशेष म्हणजे मंडळांना विविध विभागांकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार, पोलीस विभागाकडून परवानगी संबंधीची माहिती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून शिवाय पत्रकांच्या माध्यमातून दिली जाते. वीज वितरण कंपनीकडून वीज जोडणीसाठी पत्रकांच्या माध्यमातून आवाहन व माहिती दिली जाते. मात्र महाप्रसाद वितरणासारख्या महत्वाच्या विषयाला घेऊन अन्न व औषध प्रशासनाकडून अद्याप काहीच पाऊल उचलण्यात आलेले नाही. अशात एखाद्या मंडळाच्या महाप्रसादातून काही अनुचित प्रकार घडल्यास मात्र हा विषय गंभीर स्वरूप धारण करू शकतो हे येथे विचारात घेणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)-तर तशी व्यवस्था करवून घेऊमहाप्रसाद वितरणाच्या या महत्वाच्या विषयाला घेऊन अन्न व औषध प्रशासन गंभीर नाही हे या प्रकारातून कळले. मात्र ‘लोकमत’ने याबाबत जाणून घेण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी कार्यालयात जावून नोंदणी करण्यास सांगीतले. मात्र मंडळांना याबाबत माहिती होणे गरजेचे आहे, त्याशिवाय नोंदणी कशी होणार? असे विचारल्यावर अधिकाऱ्यांनी पत्रक काढण्याची व्यवस्था करू, असे थंड उत्तर दिले.