शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरुग्णांची माहिती न दिल्यास होणार शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 22:26 IST

भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने प्रकाशित केलेल्या १६ मार्च २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार खाजगी वैद्यकीय चिकित्सक, नोंदणीकृत प्रयोगशाळा चालक व खाजगी औषधी विक्रेत्यांनी क्षयरुग्णांची माहिती नियमीतपणे आरोग्य विभागाला देणे बंधनकारक केले आहे.

ठळक मुद्देनियमित माहिती देणे बंधनकारक : जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांनी काढले पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने प्रकाशित केलेल्या १६ मार्च २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार खाजगी वैद्यकीय चिकित्सक, नोंदणीकृत प्रयोगशाळा चालक व खाजगी औषधी विक्रेत्यांनी क्षयरुग्णांची माहिती नियमीतपणे आरोग्य विभागाला देणे बंधनकारक केले आहे. अन्यथा त्यांना शिक्षा होऊ शकते अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. आर.जे. पराडकर यांनी दिली.अधिसूचनेत क्षयरुग्ण उपचारावर आहेत. परंतु माहिती न देणाºया खाजगी वैद्यकीय चिकित्सक, नोंदणीकृत प्रयोगशाळा चालक व खाजगी औषधी विक्रेते यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (१८६० क ४५) कलम २६९ अन्वये ६ महिन्यांची शिक्षा व दंड करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. कलम २७० अन्वये दोन वर्षाची शिक्षा किंवा दंडात्मक कारवाई करण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे. मायक्रोबायोलॉजीस्ट व पॅथोलॉजीस्ट यांनी परिशिष्ट १ तर चिकित्सक, छातीचे तज्ज्ञ चिकित्सक, क्ष-किरण तज्ज्ञ यांनी परिशिष्ट २ मध्ये दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी क्षयरुग्णांच्या नोंदी कराव्यात.वरिष्ठ औषधोपचारांवर पर्यवेक्षक (एटीएस), वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (एसटीएलएस),ट्युबरक्युलॉसीस हेल्थ व्हिजीटर (टीबीएचव्ही), जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्याकडे क्षय रुग्णांचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर, पत्ता, पिनकोड, बचत खाते क्रमांक व आयएफएससी कोड, आधारकार्ड इत्यादी माहिती देण्याच्या सूचना केल्या आहेत. क्षयरुग्णाला देण्यात आलेल्या औषधांची उपचार पद्धती, रुग्णांची प्रगती, थुंकी नमुने, तपासणी ही माहिती देखील देण्यात यावी,असे नमूद केले. जिल्हा स्तरावर अत्याधुनिक सिबीनॅट मशिनद्वारे थुंकी नमुन्याची मोफत तपासणी जिल्हा क्षयरोग केंद्रात करुन दिली जाते. क्षयरुग्णांना शासन स्तरावरुन विनामुल्य औषधोपचार, तपासण्या, आरोग्य शिक्षण व पोषण आहारासाठी दरमहा ५०० रुपये देण्यात येत आहेत.खाजगी चिकित्सकांनी क्षयरोगाचे निदान केल्याबाबतची माहिती खाजगी वैद्यकीय चिकित्सक, नोंदणीकृत प्रयोगशाळा चालक, खाजगी औषधी विक्रेत्यांनी नियमित देण्याच्या सूचना केल्या असल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. आर.जे.पराडकर यांनी सांगितले.एक हजार रूपये अनुदानखाजगी चिकित्सकांनी क्षय रुग्ण नोंदणी केल्याबाबत ५०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान तर क्षय रुग्णांचा औषधोपचार पूर्ण झाल्यानंतर परिणाम कळविल्यास ५०० असे एकूण एक हजार रुपये शासन स्तरावरुन क्षयरुग्ण निहाय देण्यात येणार आहे.