शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
2
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
3
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
4
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
5
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
6
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
7
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
8
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
9
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
10
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
11
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
12
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
13
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
14
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
15
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
16
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
17
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
18
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
19
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

ंआघाडी सरकार सत्तेवर आल्यास गरजूंना दरमहा ६ हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:57 IST

मागील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रूपये व दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारला या आश्वासनांचा विसर पडला.

ठळक मुद्देगोंदिया तालुक्यात आमदार अग्रवाल यांच्या प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रूपये व दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारला या आश्वासनांचा विसर पडला. तर राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होताच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करुन दिलेले आश्वासन पूर्ण केले. आघाडी सरकार सत्तेत आल्यास गरजूंना दरमहा ६ हजारांची आर्थिक मदत देण्याचे राहुल गांधी यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करु, असे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी केले.कॉँग्रेस-राष्ट्रवादी व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील लोहारा, निलागोंदी, सोनपुरी, नवेगाव, बलमाटोला, निलज, लोधीटोला, अंभोरा, बटाना, हलबीटोला, चांदनीटोला, गोंडीटोला, भागवतटोला येथे आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, सभापती रमेश अंबुले, विमल नागपुरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, गेंदलाल शरणागत, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावडे, बंटी भेलावे, देवराव मसे, भागेश बिजेवार, व्यंकट मेश्राम, जगतराय बिसेन, ईश्वर पटले, चिंतामन चौधरी, टेकचंद सिहारे, धम्मानंद मेश्राम, धनलाल ठाकरे व गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते. पुढे बोलताना अग्रवाल यांनी, जनसंघर्ष यात्रेची दखल घेत भाजप सरकारने राज्यात शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची घोषणा केली. मात्र यामध्ये सरकारने लावलेल्या अटी-शर्तींमुळे अर्ध्या शेतकऱ्यांचीही कर्जमाफीचा माफीचा लाभ मिळाला नसल्याचा आरोप केला.एकीकडे, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात धानाला २५०० रूपये भाव हमीभाव दिला जात आहे. तर राज्यात १७५० रूपये भाव देऊन शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला.भापजच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे देशातील शेतकरी बेहाल झाला आहे. त्यामुळे राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड प्रमाणेच आता केंद्रातूनही भाजपला निरोप देण्याची वेळ आली असल्याचेही आमदार अग्रवाल म्हणाले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल