शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

आठ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:23 IST

आपला आदर्श पुढे ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षण देणाºया शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा चौमुखी विकास घडविण्यासाठी प्रयत्न केला.

ठळक मुद्देशिक्षक दिनाचे कार्यक्रम बालकदिनी : माध्यमिक विभागातील सात तालुक्यात उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपला आदर्श पुढे ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षण देणाºया शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा चौमुखी विकास घडविण्यासाठी प्रयत्न केला. त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून जिल्ह्यातील आठ शिक्षकांना सन २०१७ चा आदर्श शिक्षक पुरस्कार बालकदिनी (दि.१४ नोव्हेंबर) देण्यात आला. ग्रामपंचायत निवडणूक आचार संहिता सुरू असल्याने शिक्षक दिनाचा कार्यक्रम मंगळवारी बालकदिनी जि.प.च्या सभागृहात घेण्यात आला.जिल्हा निवड समितीचे प्राथमिक शिक्षण विभागाचे सात तर माध्यमिक विभागाच्या एका शिक्षकाची निवड केली आहे. जिल्ह्यात विद्यार्थ्यांना शिक्षण देणाºया शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येत आहे. सन २०१७ या वर्षासाठी आठ शिक्षकांचा गौरव करण्यात आला आहे. त्यात प्राथमिक विभागातून गोंदिया तालुक्यातून निलज येथील जि.प. हिंदी वरिष्ठ प्राथमिक शाळेतील रोशनलाल यशवंतराव मस्करे, गोरेगाव तालुक्यातील चिल्हाटी येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेतील पुरूषोत्तम गोपाल साकुरे, तेढा येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेतील राजुकमार धनलाल बागडे, आमगाव येथील जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेतील (मुले) कविता कालीपद चक्रवर्ती, देवरी तालुक्यातील मेहताखेडा येथील जि.प. प्राथमिक शाळेतील बालचंद महादेव बडवाईक, सालेकसा तालुक्यातील विचारपूर येथील जि.प. हिंदी वरिष्ठ प्राथमिक शाळेतील पौर्र्णिमा संदीप विश्वकर्मा, तिरोडा तालुक्यातून भजेपार येथील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेतील तेजलाल कुसोबा बोपचे यांची निवड करण्यात आली आहे.तर माध्यमिक विभागातून आमगाव येथील जि.प. हायस्कूलमधील मधुकर हगरू बुरडे यांना पुरस्कार देण्यात आला. कार्यकक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यपालन अधिकारी रवींंद्र ठाकरे, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, शिक्षण सभापती पी.जी. कटरे, समाज कल्याण सभापती देवराज वडगाये, जि.प.सदस्य शोभेलाल कटरे, रमेश अंबुले, गिरीश पालीवाल, सुरेश हर्षे, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, लता दोनोडे, रजनी गौतम, सिमा मडावी, विश्वदीप डोंगरे, सोनवाने, विणा बिसेन, पं.स. सदस्य चंद्रिकापुरे उपस्थित होते. यावेळी आठही तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षकांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. संचालन शिक्षिका मंजूश्री देशपांडे तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी महेंद्र मोटघरे यांनी सहकायर केले. यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी, मेहंद्र मोटघरे, सुभाष रामरामे, वाय.सी. भोयर, टी.बी. भेंडारकर, डी.बी. साकुरे व खडसे यांनी सहकार्य केले.पाच तालुक्यातील प्रस्तावच नव्हतेप्राथमिक व माध्यमिक विभागातील प्रत्येक तालुक्यातील एक अशा प्रत्येक विभागासाठी आठ अशा १६ शिक्षकांना पुरस्कार द्यायचे होते. परंतु माध्यमिक शिक्षकांकडून अनेकदा प्रस्तावच येत नाही. यावर्षी सुद्धा हीच स्थिती होती. गोंदिया, गोरेगाव, सालेकसा, अर्जुनी-मोरगाव व तिरोडा या पाच तालुक्यातील एकाही शिक्षकाने आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल केले नाही. देवरी व सडक-अर्जुनी या दोन तालुक्यातील प्रत्येकी एक असे दोन प्रस्ताव आले मात्र या दोन्ही तालुक्यातील प्रस्तावांना समितीने अमान्य केले आहे. प्राथमिक विभागातील सडक-अर्जुनी येथीलही प्रस्तावाला समितीने अमान्य केले आहे. तर गोरेगाव तालुक्यातील दोन शिक्षकांना पुरस्कार जाहीर केले आहे.४० गुणवंताचा सत्कारयावेळी आठही तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील साहील शहारे, स्मिीती टेंभूर्णे, विशाल मटाले, अजय शेंडे, तारकेश्वरी दडमल, मंजील शहारे, तिरोडा तालुक्यातील त्रिवेणी बांगरे, राज रहांगडाले, स्रेहल अलोने, सोनाली गोंधुळे, लिना कटरे, प्रगती श्रीरंगे, अल्का बोपचे, प्रेरणा ढोक, पल्लवी राऊत, प्राजक्ता रहांगडाले, विलास पटले, हितेश चौधरी, गोरेगाव तालुक्यातील धनश्री सोनवाने, निकेश राऊत, नोमेश बोपचे, देवरी तालुक्यातील नैनिताा ताम्रकार, गोंदिया तालुक्यातील रितेक ढोढरमल, चिराग मोहतुरे, दीपाली मेश्राम, नयन हरिणखेडे, दिशा हिवारे, ज्योती बाळणे, जयसिंग नागपुरे, तेजस्वीनी पटले, शैलेश वैद्य, आमगाव तालुक्यातील प्रियंका सोनवाने, हिमांशू वाघमारे, आचल पारधी, सालेकसा तालुक्यातील दुर्गेश चौरागडे, प्रशांत उपराडे, संगीता बावनथडे, सडक-अर्जुनी तालुक्यातील खेमेश्वरी तोंडफोडे, भारती बंशपाल, अरविंद प्रधान यांचा सत्कार करण्यात आला.