शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

सटवा गावाची आदर्श स्मार्ट ग्रामकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 22:06 IST

शासनाच्या विविध विकासात्मक योजना गावात राबवून सटवा गावाला आदर्श ग्राम करण्याचा संकल्प येथील सरपंचाने केला असून त्या दृष्टीने वाटचाल सुध्दा सुरू केली आहे. स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी, सिंचनाचा प्रश्न सोडविणे, रोजगार निर्माण करणे, .......

ठळक मुद्देशासकीय निधीतून विकास कामे : गावाचा कायापालट करण्याचा संकल्प, वृक्षारोपण करणार

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : शासनाच्या विविध विकासात्मक योजना गावात राबवून सटवा गावाला आदर्श ग्राम करण्याचा संकल्प येथील सरपंचाने केला असून त्या दृष्टीने वाटचाल सुध्दा सुरू केली आहे. स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी, सिंचनाचा प्रश्न सोडविणे, रोजगार निर्माण करणे, गावातील युवक, प्रौढ यांना एक छताखाली आणणे, गाव भक्तीमय करणे, वाचणालय, पथदिवे, वृक्षारोपण,ग्रामपंचायत सुशोभीत व फळबाग तयार करु न स्मार्टग्राम करण्याचा संकल्प सरपंच विनोद पारधी यांनी केला आहे.तालुक्यातील सटवा येथील सरपंच विनोद पारधी हे कला शाखेत पदवीधर असून लहानपणापासून समाजकारण करण्याची आवड होती यामुळे़ नोकरी न करता शेती व्यवसायाबरोबर समाज कार्य सुरु केले. सन २०१७ मध्ये ग्रामपंचायत सटवाच्या निवडणुका लागल्या यात सरपंच पदाकरीता भारतीय जनता पक्षाला समर्थन करु न विनोद पारधी यांनी निवडणुक जिंकली व सरपंचपदी आरुढ झाले. यानंतर सर्व प्रथम गावातील युवकांना एकत्र करुन स्वच्छ भारत अभियान राबविले. गावातील केरकचरा ,प्लास्टीक पिशव्या गोळा करण्यास सुरु वात केली. घरोघरी प्रत्येक कुटुंब निहाय शौचालय इमारत बांधकाम करण्यास प्रवृत्त केल्याने उघड्यावर शौचविधी बंद केला. सांडपाणी वाहुन नेणाऱ्या सिंमेट काक्र ींट नाल्या तयार करु न त्यावर झाकण तयार केले.गावात पिण्याचे पाणी स्त्रोत १६ हातपंप, ४० खासगी विहिरी, २ शासकीय विहिरी असून पाणी टंचाई होवू नये, म्हणून विहिरीची गाळ काढले व हातपंपाना लागणारे साहीत्य मिळवून घेतल्याने पाणी टंचाईवर मात करता आले.प्रधानमंत्री घरकुल योजना, रमाई घरकुल योजना, सबरी घरकुल योजनाचे घरकुल गरजू लाभार्थ्यांना मिळत आहे. महिला, पुरु ष मजुरांना कामाचा लाभ देण्यासाठी मग्रारोहयोव्दारे रानतलाव खोलीकरणासाठी २१ लाख ७६ हजार ८८० रु पये मंजूर करु न २०१४ मजुरांना काम देण्यात आले. पर्यावरण समतोल राखण्यासाठी ५ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. गावकऱ्यांना मुख्य व्यवसाय शेती आहे. पण सिंचनाचा प्रश्न आहे यावर तोडगा निघावा म्हणून कंटगी मध्यम प्रकल्पाचे पाणी कालव्याव्दारे रानतलावात सोडणे त्यातून गाव तलावात आणल्यास सिंचनाचा प्रश्न आमदार विजय रहांगडाले यांच्या मध्यस्तीने प्रश्न लागणार आहे.रस्त्यांचे जाळे तयार करणारजिल्हा परिषदेतंर्गत ३०/५४ निधी अंतर्गत डव्वा, सटवा, चिचगावटोला, सिलेगाव, मेंगाटोला, पाथरी, गोरेगाव रस्त्याचे बांधकाम मंजूर झाल्याने या मार्गावर लवकरच बससेवा सुरु करण्यात येणार आहे. गावातील महिला बचत गटांना उमेदसह जोडण्यात आले आहे. सटवा स्मार्ट गाव करण्यासाठी भक्तीमय वातावरण निर्माण करु न ३ भजन मंडळे तयार करण्यात आली. यामंडळाव्दारे गुरु वारी व शनिवारला मंदिरात कीर्तन माला,भजने आयोजीत केल्या जात आहे.पदाधिकाºयांनीकेला संकल्पवाचनालय तयार करण्याचे प्रस्ताव असल्याने सटवा हे गाव स्मार्ट गाव करणार असे सरपंच विनोद पारधी यांनी सांगितले. सटवा स्मार्ट गाव करण्यासाठी उपसरपंच ओमप्रकाश चौधरी, सदस्य गणराज रहांगडाले, ओमेंद्र ठाकुर, रामेश्वरीताई ठाकुर, गिता रहांगडाले,चित्ररेखा रहांगडाले,सुर्यकांता चौधरी , ग्रामसेविका सविता पाटील,भाकचंद रहांगडाले,मयूर कोल्हे, सुभाष ठाकुर, राजेश रहांगडाले, नूतन बिसेन व गावकºयांचे सहकार्य मिळत आहे.