शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

संकरित वाण देत आहे भरघोष उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

जिल्ह्यातील शेतकरी कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करीत आहे. मागील काही वर्षापासून धान उत्पादक शेतकऱ्यांनी सुधारीत वाणाचे धान बियाणे वापरुन शेतीत उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न चालविला. परंतु आता शेतकऱ्यांनी संकरीत वाणाचे (हायब्रीड) धान बियाणे वापरुन धानाचे दुप्पट उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे. यात बºयाचपैकी शेतकºयांना यश येत आहे.

ठळक मुद्देरोग प्रतिकारक क्षमताही अधिक : सरासरीपेक्षा दुप्पट उत्पादन

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : जिल्ह्यातील शेतकरी कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करीत आहे. मागील काही वर्षापासून धान उत्पादक शेतकऱ्यांनी सुधारीत वाणाचे धान बियाणे वापरुन शेतीत उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न चालविला. परंतु आता शेतकऱ्यांनी संकरीत वाणाचे (हायब्रीड) धान बियाणे वापरुन धानाचे दुप्पट उत्पादन घेण्यास सुरूवात केली आहे. यात बºयाचपैकी शेतकºयांना यश येत आहे. सामान्य स्वरुपाच्या परिस्थितीत संकरीत वाणातून धानाचे भरघोष उत्पादन घेऊन आपले उत्पन्न वाढवित आहेत. इतर शेतकºयांना सुद्धा प्रेरणा देण्याचे काम करीत आहेत.धान उत्पादक शेतकरी पारंपारिक शेतीवरच अवलंबून आहे. वेळोवेळी शासनाकडून किंवा जनजागृती करणाºया संस्था किंवा विशेषज्ञाकडून धान उत्पादन शेतीमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचे पुरजोर प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु अद्यापही मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्गाने बदल स्विकार केलेला दिसत नाही. याचे विविध कारणे आहेत. यात एकतर आपली शेती जास्तीत जास्त प्रमाणात वरथेंबी पावसावर अवलंबून असल्याने आधुनिक पद्धतीनुसार शेतीत पाण्याचे नियोजन सुयोग्य पद्धतीने करता येत नाही. कधी फार कमी पाऊस,अतिवृष्टीचा फटका यात शेतीचे सगळे गणित चुकून जातात. दुसरे म्हणजे शेतकरी वर्ग आपल्या वडिलोपार्जित शेतीला पांरपरिक पद्धतीने पीक घेण्यासाठी उपयोग करीत असतो. नवीन बदल स्विकारण्याच्या तयारीत नसतो. शासनाच्या योजना नवीन प्रयोग इत्यादी छोट्या छोट्या शेतकºयांपर्यंत पोहचतच नाही. परिणामी कमी उत्पादन आणि तोट्याची शेती करण्यास शेतकºयांना भाग पडावे लागते. यामुळे अनेक युवा वर्गाने शेतीकडे पाठ सुद्धा फिरविली. परंतु आता मोठ्या प्रमाणावर काही युवा आणि शिक्षित वर्गाचा शेतीकडे कल वाढत चालला आहे. परंतु तो आता पारंपारिक शेतीचा त्याग करुन कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे जास्त लक्ष देऊ लागला.अनेक शेतकºयांनी सिंचनाची सोय करण्यासाठी विहीर, बोअरवेल खोदण्यावर लक्ष केंद्रीत करुन सिंचनाची सोय उपलब्ध झाली तर मर्जीप्रमाणे पीक घेता येईल, असा आशावाद निर्माण करीत सिंचनाच्या सोयीसाठी धडपड करीत आहेत.ज्या शेतकºयांनी आपल्या शेतीत सिंचनाची सोय केली आहे. ते शेतकरी आता सुधारीत वाणासोबतच संकरित वाणाचे बियाणे वापरु लागले आहेत. त्यांच्या शेतीत सरासरीपेक्षा दीडपट ते दुप्पट धान उत्पादन घेतले जात आहे. अनेक शेतकरी शेजारच्या छत्तीसगड राज्यातून नवनवीन संकरित धान बियाणे खरेदी करुन सुद्धा आणत असतात. संकरित धान बियाणांमध्ये रोग प्रतिकारक क्षमता अधिक असून रोवणीसाठी थोडा उशीरा झाला तरी उत्पादन मिळते. रासायनिक खते, किटनाशकांचा खर्च फार कमी लागत असते. काही संकरित वाण असेही मिळू लागले की पाऊस कमी झाला किंवा गरजेपेक्षा जास्त झाला तरी उत्पादनावर फारसा फटका बसत नाही. त्यामुळे आता अनेक शेतकरी संकरित वाण (हायब्रीड) कडे शेतकºयांचा कल वाढत आहे.शेतकºयांला स्वत:च्या उदरनिर्वाहसह धानाची विक्री करुन आपल्या इतर गरजा भागविण्यासाठी सुद्धा उत्पादनात वाढ हवी असते. त्यामुळे अनेक शेतकरी वर्षभर खाण्यापूरते काही प्रमाणात बारीक प्रजातीचे धान लावतात. उर्वरित ठिकाणी संकरित वाणाचे धान लागवड करीत भरपूर उत्पादन घेऊ लागले आहेत.येणाºया काळात सर्वच शेतकºयांनी धान उत्पादनात असे बदल स्विकारल्यास निश्चितच भरघोष पीक आणि भरपूर उत्पन्न प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी शेतकºयांनी आपल्या मानसिकतेत बदल आणि शासनाने इमानदारीने शेतकºयांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.

टॅग्स :agricultureशेती