शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

हुश्श.. पाच तालुके झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया :  मागील दोन महिन्यांपासून कोरोनाला पूर्णपणे उतरती कळा लागली आहे. आठपैकी पाच तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  मागील दोन महिन्यांपासून कोरोनाला पूर्णपणे उतरती कळा लागली आहे. आठपैकी पाच तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले असून उर्वरित तीन तालुक्यात केवळ सात कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्हा येत्या आठवडाभरात कोरोनामुक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शुक्रवारी (दि.६) ४५७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ४१० नमुन्यांची आरटीपीसीआर तर ४७ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोना बाधित आढळले नाही. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य टक्के आहे. कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात आला. त्यामुळे ही निश्चितच जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी जिल्हावासीयांना पूर्वी इतकीच काळजी घेण्याची गरज आहे. आपले थोडेही दुर्लक्ष कोरोनाला पुन्हा आमंत्रित करण्यास कारणीभूत ठरू शकते. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४३८११२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २२०१९८ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २१७९१४ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४११९३ नमुने कोरोना निगेटिव्ह आले. यापैकी ४०४८४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. 

सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण अर्जुनी मोरगाव तालुक्यात - जिल्ह्यातील गोरेगाव, आमगाव, सालेकसा, देवरी, सडक अर्जुनी हे पाच तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. तर गोंदिया १ आणि तिरोडा तालुक्यात १ रुग्ण आहे. तर सर्वाधिक पाच कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण अर्जुनी मोरगाव तालुक्यात आहे. ६२४,१९६ नागरिकांचे लसीकरण - कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरण हे महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यावर सध्या भर दिला जात आहे. जिल्ह्यात सध्या १९४ केंद्रावरून लसीकरण मोहीम सुरू असून आतापर्यंत ६,२४,१९६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ५० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या