शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 21:43 IST

पती-पत्नीमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यावर काठीने जबर मारहाण करून तिचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि.११) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास आमगाव तालुक्यातील किंडगीपार येथे घडली.

ठळक मुद्देकिंडगीपार येथील घटना : आरोपी पतीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : पती-पत्नीमध्ये झालेल्या कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यावर काठीने जबर मारहाण करून तिचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि.११) सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास आमगाव तालुक्यातील किंडगीपार येथे घडली. आमगाव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपी पतीला अटक केली आहे.शंकर लक्ष्मण मुनेश्वर, रा. किंडगीपार असे आरोपी पतीचे नाव आहे. डिलेश्वरी मुनेश्वर असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार शंकर हा पत्नी व दोन मुलांसह किंडगीपार येथे राहत होता. शंकर हा मोटार मॅकेनिकचे काम करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होता. पत्नी डिलेश्वरी मुनेश्वर हिच्यासोबत त्याचा नेहमी वाद होत होता. यामुळे शंकर त्रस्त असल्याचे बोलल्या जाते. शुक्रवारी (दि.११) रात्री ७.३० वाजता पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. या दरम्यान शंकरने स्वयंपाक घरातील चुलीमधील काठी उचलून डिलेश्वरीच्या डोक्यावर जबर मारहाण केली.यात तिचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी फिर्यादी मेघनाथ दयाराम मेंढे (६१) रा. किंडगीपार यांनी आमगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.तक्रारीवरुन आमगाव पोलिसांनी भादंवि ३०२ अंतर्गत गुन्हा नोंद करुन आरोपी पती शंकर मुनेश्वरला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आमगाव पोलीस करीत आहे.

टॅग्स :Murderखून