शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पतीला सात वर्षांचा सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:47 IST

हुंड्यासाठी पत्नीचा छड करुन आत्महत्येस प्रवृत्त करणाºया पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षाचा कारावास आणि तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला.

ठळक मुद्देहुंडाबळी प्रकरण : आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल दोषी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हुंड्यासाठी पत्नीचा छड करुन आत्महत्येस प्रवृत्त करणाºया पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षाचा कारावास आणि तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. ही सुनावणी बुधवारी (दि.२२) रोजी झाली.सावरीटोला येथील रहिवासी भानुलाल पुनाजी दमाहे याचा विवाह सन २००२ मध्ये तिरोडा तालुक्याच्या बोहरा गावातील रहिवासी प्रमिला राजेंद्रसिंह हिरापुरे यांची मुलगी संगीतासह झाला होता. लग्नानंतर आरोपी पती व सासरा पुनाजी होलू दमाहे, सासू बलवंता दमाहे तसेच दीर शिवा दमाहे हे सर्व संगीताला माहेरून हुंडा आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करीत होते. याची माहिती संगीताने वेळोवेळी आपल्या माहेरच्यांना दिली होती. तसेच पतीद्वारे धर्म परिवर्तन करण्यासाठीसुद्धा दबाव घातला जात होता. याचा विरोध केल्यावर आरोपी पती मंगळसूत्र व टिकली लावण्यास प्रतिबंध घालून त्रास देवू लागला. पतीकडून होणाºया सततच्या छळाने त्रस्त होवून संगीताने ८ जानेवारी २००९ रोजी कीटकनाशकाचे प्राशन केले. त्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मृतक संगीताच्या आईला मिळताच त्यांनी सर्व आरोपींची तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यात केली.यानंतर पोलिसांनी आरोपींविरूद्ध भादंविच्या कलम ३०४ (ब), ४९८ (अ) व ३४ अन्वये गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपासाचा अहवाल न्यायालयात सादर केला. त्यात १० साक्षीदार व वैद्यकीय रिपोर्टच्या आधारावर जिल्हा सत्र न्यायाधीश क्र.२ माधुरी आनंद यांनी मुख्य आरोपी पतीला कलम ३०४ (ब) अन्वये सात वर्षांचा कारावास व कलम ४९८ (अ) व तीन हजार रूपयांचा दंड ठोठावला. तसेच इतर तीन आरोपी पुनाजी दमाहे, बलवंता पुनाजी दमाहे व शिवा दमाहे यांना मुक्त करण्यात आले. सदर प्रकरणात पोलिसांच्या वतीने तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक दिलीप कुंदोजवार यांनी चौकशी केली. या प्रकरणात सरकारच्या वतीने सरकारी वकील कैलाश खंडेलवाल व प्रकाश तोलानी यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालय