गोंदिया : घट विसर्जन करण्यासाठी इनोवा गाडीवर गेलेल्या सासरा व पतीने एका विवाहितेला कालव्यातील पाण्यात बुडवून ठार केले. या प्रकरणात आमगाव पोलिसांनी पती व सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. आमगाव तालुक्याच्या अंजोरा येथील आरोपी ललीत हेमराज डोंगरे (२८) याचे २६ मे २०१४ रोजी गोंदियातील निता हिच्याशी विवाह झाला. लग्नानंतर तिला तिच्या प्रियकराचे पत्र येत असल्याचा संशय घेत पती तिचा काटा काढण्याचा प्रयत्नात होता. घरी स्थापन केलेले घट विसर्जन करण्यासाठी आरोपी ललीत हेमराज डोंगरे (२८), हेमराज आडकू डोंगरे (६३) व मृतक निता ललीत डोंगरे (२५) हे तिघेही इनोवा एमएच ३४ के ४८७९ या वाहनाने कालव्यावर गेले. घट विसर्जन करण्यासाठी निता व ललीत हे पती पत्नी गुडघ्याभर पाण्यात उतरले. घट विसर्जन करताच ललीत व निताच्या मागे उभा असलेला हेमराज डोंगरे ने निताला मागून धक्का दिला. या ती पाण्यात पडली. परंतु आपल्या बचावासाठी तीने आपल्या पतीचा हात पकडला. त्यामुळे तिचा पतीही पाण्यात पडला. त्यानंतर पतीने बाहेर काढून हेमराज व ललीत या दोघांनी तिचे केस पकडून तिचे नाक, तोंड पाण्यात बुडवून ठेवले. यात तिचा मृत्यू झाल्यावर तिला कालव्यात ढकलून दिले. घटनास्थळापासून ३० ते ३५ फूट अंतरावर तिचा मृतदेह वाहून गेला. यानंतर वाहनात बसून सदर आरोपी घरी गेले. घरी गेल्यावर निता वाहून गेल्याचा खोटा कांगावा त्यांनी केला. तसी तक्रार पोलिसातही केली. या संदर्भात आमगाव पोलिसांनी तपास केल्यावर सहायक पोलीस निरीक्षक विशाल राजे यांनी या प्रकरणात आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी आरोपी अडकण्याची दाट शक्यता आहे.
पती व सासऱ्याने केले ठार
By admin | Updated: October 5, 2014 23:08 IST