शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांची शिकार करणारे जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:25 IST

जवळील विहिरगाव बडर्याच्या शेत शिवारातील लागून असलेल्या क्षेत्र क्रमांक ७३३ संरक्षीत वनात रात्रीच्या वेळी विद्युत प्रवाहाने वन्यप्राण्यांची शिकार करण्याचा प्रकार सुरु होता.

ठळक मुद्देगस्तीदरम्यान प्रकार उघडकीस : शिकार करण्याचा डाव

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जवळील विहिरगाव बडर्याच्या शेत शिवारातील लागून असलेल्या क्षेत्र क्रमांक ७३३ संरक्षीत वनात रात्रीच्या वेळी विद्युत प्रवाहाने वन्यप्राण्यांची शिकार करण्याचा प्रकार सुरु होता. दरम्यान याप्रकरणी अर्जुनी मोरगाव विद्युत व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मुद्देमालासह तिघांना ताब्यात घेतले. ही घटना शुक्रवारी (दि.२८) रात्री घडली.प्राप्त माहितीनुसार विहिरगाव बर्ड्या परिसरात आठवड्याभरापासून रात्रीच्या वेळी विद्युत पुरवठा जाण्याचा नित्यक्रम सुरु होता. विजेचा लपंडाव एकाएकी का होतो याचे कारण विद्युत विभागाला सुद्धा कळत नव्हते. याचा उलगडा करण्यासाठी विद्युत विभागाच्या कर्मचाºयांनी गुरूवार आणि शुक्रवारी या परिसरातील जंगलात रात्री गस्त घातली. सानगडीवरुन येणाºया ११ हजार केव्हीचा विद्युत तारांवर आकडा टाकून वायर शेत शिवारात पसरवून वन्यप्राण्यांची शिकार केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. तर काहीजण विहिरगाव बिटातील सागवान व कडु लिंबाचे झाडे कापून नेली जात असल्याचे आढळले.विद्युत विभागाच्या अधिकाºयांनी याची माहिती बाराभाटी क्षेत्र सहाय्यक कार्यालयाला दिली. दरम्यान वनविभागाने चौकशी अंती विहिरगाव-बर्ड्या येथील कन्हैया नागो साखरे (५५), दत्तू पांडुरंग कोसरे (४८), धनंजय दत्तू कोसरे (२२) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सागवान चिराण पाट्या ०.१८६ घमी, कडुलिंब चिराण ०.०६५ घमी लाकूड जप्त करण्यात आले.या तिघांवर वन गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास क्षेत्र सहाय्यक एच.एच.शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीटगार्ड परसगाये, परशुरामकर करीत आहेत. 

टॅग्स :Arrestअटक