शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाणलोट सचिवांवर उपासमारीची पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:40 IST

केंद्र व महाराष्ट्र शासनांतर्गत शेतकरी व गावाच्या विकासासाठी केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम तिरोडा तालुक्यातील ११ गावात संस्थेमार्फत राबविण्याचा करार झाला होता. त्यानुसार, सन २०१२-१३ पासून काम सुरुवात करण्यात आले.

ठळक मुद्दे२६ महिन्यांपासून मानधन नाही : कृषी विभागाकडे पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : केंद्र व महाराष्ट्र शासनांतर्गत शेतकरी व गावाच्या विकासासाठी केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम तिरोडा तालुक्यातील ११ गावात संस्थेमार्फत राबविण्याचा करार झाला होता. त्यानुसार, सन २०१२-१३ पासून काम सुरुवात करण्यात आले. यात ग्रामपंचायत मार्फत गावपातळीवरुन गावातील कृषी पदवीधारक व डिप्लोमा धारक बेरोजगारांंची निवड ग्रामसभेच्या माध्यमातून करण्यात आली. सचिवांनी कामाला सुरुवात केली मात्र २६ महिन्यांपासून पाणलोट सचिवांना मानधन मिळालेले नाही.पाणलोट व्यवस्थापनाची कामे जिल्हा कृषी अधीक्षक यांच्यामार्फत सन २०१२-१३ मध्ये सडक-अर्जुनी येथील आदिवासी शैक्षणिक संशोधन संस्थेला देण्यात आली. पण संस्थेने कोणतेही काम व प्रकल्प न राबविता लाखो रुपये शासनाच्या खात्यातून काम केल्याचे सांगून उचलले. तसेच पाणलोट सचिवांचे मानधन न देता स्वत:च पैसे आपल्या घशातचा आरोप आहे. त्यानंतर सन २०१७-१८ मध्ये गोंदिया येथील एका संस्थेला काम देण्यात आले.संस्थेला २३ महिन्यांचे मानधन देण्यात आले मात्र त्यांनी फक्त ४ महिन्यांचे मानधन दिले व उर्वरीत मानधन सोटेलोटे करुन आपल्या घशात टाकले. काम न करता शासनाचे लाखो रुपये फर्निचर, आलमारी, सोलरलाईट व संगणक खरेदीच्या नावावर दोन्ही संस्थांनी उचलले. यांची तक्रार ११ गावांच्या सरपंचांनी केली होती, पण त्यांच्याही पत्राला कृषी अधीक्षकांनी केराच्या टोपलीत टाकले.दरम्यान, पाणलोट सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना २४ आॅगस्ट १८ व २८ आॅक्टोबर २०१८ निवेदन दिले. मात्र त्यावर अजूनही कोणतीच कार्यवाही झाली नाही.जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याशी सचिवांनी संपर्क साधून मानधनाबद्दल विनंती केली असता त्यांनी मानधन संस्थेला देण्यात आले असून आपण कार्यवाही व फौजदारी गुन्हा दाखल करु असे सांगीतले होते.मात्र ३ महिन्यांचा काळ लोटूनही काहीच झाले नाही. परिणामी, पाणलोट सचिवांवर आता उपासमारीची पाळी असून कुटूंबाचा उदरनिर्वाह करावा कसा असा प्रश्न त्यांना पडला आहे. मात्र प्रशासनाने याची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे आता पाणलोट सचिवांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मार्च महिन्यात मानधन न मिळाल्यास ११ गावांतील पाणलोट सचिव महेंद्र भगत परसवाडा, छत्रपती पटले बोरा, संजय भोयर चांदोरी खुर्द, मुन्नालाल तुरकर बाघोली, विजय मिश्रा सावरा, अरुण मिश्रा पिपरीया, प्रभुदास साकुरे अर्जुनी, अशोक पंधरे बिहीरीया, खेमराज शहारे इंदोरा, अशोक धानगाये किडंगीपार, दिलीप कडव खैरलांजी यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.