शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा-कोयलारी : येथील आश्रम शाळेच्या पूर्व दिशेला एक नाला आहे. त्या नाल्याच्या वरच्या भागात २३ आदिवासी शेतकऱ्यांची शेती आहे. दरवर्षी पावसाळ्यात या नाल्यात १० ते १५ फूट पाणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे नाल्यात पाणी असल्याने शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाणे ...

ठळक मुद्देपावसामुळे शेतात जाण्याचा मार्ग बंद : प्रशासनाने दखल घेण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा-कोयलारी : येथील आश्रम शाळेच्या पूर्व दिशेला एक नाला आहे. त्या नाल्याच्या वरच्या भागात २३ आदिवासी शेतकऱ्यांची शेती आहे. दरवर्षी पावसाळ्यात या नाल्यात १० ते १५ फूट पाणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे नाल्यात पाणी असल्याने शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाणे कठीण झाले आहे. शेतातील बांध्यामध्ये पाणी भरुन असल्याने रोवणी खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या २३ शेतकºयांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे.प्राप्त माहितीनुसार नाल्याच्या वरच्या भागात छत्रपाल परतेकी, केवलराम परतेकी, सेवकराम परतेकी, चंद्रशेखर परतेकी, नारायण पंधरे, विलास पंधरे, प्रल्हाद पंधरे, लेमन पंधरे, तिजूराम टेकाम, मनिराम पंधरे, भागवत पंधरे, अनिरुध्द पंधरे, हेमराज वाढीवे, भोजराज वाढीवे, सुरेंद्र वाढीवे, रुपचंद वाढीवे, रमेश वाढीवे, गणेश वाढीवे, विना सलामे, लक्ष्मी पंधरे, पारबता वाढीवे व सुमा वाढीवे या शेतकऱ्यांची शेती आहे. मात्र या परिसरातील नाल्यावर पूल नसल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्याच्या दिवसात शेतात जाण्याची अडचण निर्माण होते. त्यामुळे शेतीची कामे करायची कशी असा प्रश्न निर्माण होतो. तर बरेचदा शेतकऱ्यांना शेती पडीक ठेवावी लागते. यंदा याच नाल्यावर लघू पाटबंधारे विभागाकडून मग्रारोहयोची कामे करण्यात आली. त्यामध्ये फरसाची दीड फूट उंची वाढविण्यात आली. त्यामुळे पाण्याच्या पातळीत अधिक वाढ झाली. परिणामी छत्रपाल परतेकी यांचे गट क्र. ८९ व ८३ मधील शेत पाण्याखाली आले. जवळपास एक हेक्टर शेती बुडाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या सर्व शेतकऱ्यांचा शेती हाच व्यवसाय असून यावरच त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. शेतातील बांध्यामध्ये पाणी भरुन असल्याने पिक वाया जाण्याची शक्यता आहे.प्रशासनाचे दुर्लक्षशेंडा येथील शेतकऱ्यांनी नाल्यावर पूल तयार करुन देण्याची मागणी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाकडे निवेदन देऊन अनेकदा केली. तसेच लोकप्रतिनिधींना सुध्दा यासंबंधिचे निवेदन दिले. मात्र अद्यापही शासन आणि प्रशासनाने त्यांच्या समस्येची दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकºयांवर आर्थिक संकट ओढावले आहे.शासन आदिवासींच्या विकासासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा करते. मात्र शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे.शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारास्थानिक प्रशासनाने येथील नाल्यावर पूल तयार करुन देवून समस्या मार्गी लावावी. अन्यथा या विरोधात तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्याचा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.सध्या मी बैठकीसाठी बाहेर आहे. कार्यालयात पोहचल्यानंतर याची माहिती घेवून शेतकऱ्यांची समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार.-अखिलभारत मेश्राम, तहसीलदार सडक-अर्जुनीशेतकऱ्यांची तक्रार अद्याप मला प्राप्त झाली नाही. तक्रार प्राप्त होताच पंचनामा करुन अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल.- एस.बी.राठोड, तलाठी साजा क्रं. १३ शेंडा