शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:30 IST

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा नवेगावबांध : वन्यप्राण्यांनी शेतशिवार व गावात शिरकाव करून मनुष्य व पाळीव प्राण्यांना जखमी करणे किंवा ठार ...

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा

नवेगावबांध : वन्यप्राण्यांनी शेतशिवार व गावात शिरकाव करून मनुष्य व पाळीव प्राण्यांना जखमी करणे किंवा ठार करणे सुरू केले आहे. या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

वातावरणातील बदलामुळे भीती

गोंदिया : कोरोना विषाणू महामारीचे संकट डोक्यावर घोंगावत असतानाच, अचानक होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखीसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. यामुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. कोरोनामुळे नागरिक अगोदरच घाबरलेले आहेत. त्यात सर्दी, खोकला किंवा ताप आल्यास नागरिक कोरोनाची धास्ती घेत आहेत. जिल्ह्यात आता कोरोना नियंत्रणात असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

बस स्थानके ठरत आहेत शोभेची वास्तू

गोरेगाव ­: शहरात १०-१२ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून बस स्थानकांची निर्मिती करण्यात आली. या बस स्थानकावर आजघडीला कुणीही कर्मचारी राहत नाहीत, तसेच गोरेगावमार्गे जाणाऱ्या बस या स्थानकावर थांबत नाही. त्यामुळे बस स्थानकावर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात बस स्थानकाची बांधणी झाल्यावर बऱ्याच दिवसांनी बसथांबा होता, पण आजघडीला या स्थानकावर बसचा थांबा नाही.

घाटकुरोडा- देव्हाडा रस्ता उखडला

मुंडीकोटा : जवळील ग्राम घाटकुरोडा ते देव्हाडा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना या रस्त्याने ये-जा करणे त्रासदायक ठरत आहे. या मार्गावरुन शालेय विद्यार्थी सुध्दा नियमित ये-जा करतात. त्यांना सुध्दा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी आहे.

दिव्यांग-निराधारांवर उपासमारीची पाळी

परसवाडा : तिरोडा तालुक्यातील संजय गांधी, श्रावणबाळ, विधवांना, आर्थिक कुटुंब साहाय्यांना ४-५ महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. निराधारांची ना काम-ना पैसा अशी स्थिती झाली आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे

तंटामुक्त समितींचे तंट्यांकडे झाले दुर्लक्ष

गोंदिया : शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गावमोहीम सुरू केली. याअंतर्गत तंटामुक्त घोषित झालेल्या गावांना शासनाने बक्षीसरूपात रक्कम दिली. मात्र, गाव तंटामुक्त झाले व बक्षिसांची रक्कम मिळाल्यानंतर समित्यांनी तंट्यांकडे दुर्लक्ष आहे.

दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर

गोंदिया : येथील रेल्वे स्थानकालगत प्रभू रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. कित्येकदा त्यातून दुर्गंध पसरतो. त्यामुळे या परिसरात घाणच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

मजुरी वाढल्याने शेतकरी अडचणीत

गोरेगाव : जिल्ह्यात सध्या धान कापणी व मळणीला जोर आला आहे. त्यामुळे शेतकरी मजुरांच्या शोधात आहे. मात्र, मजुरी वाढविण्यात आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

बेरोजगारांच्या हाताला काम द्या

अर्जुनी-मोरगाव : तालुक्यात मोठ्या उद्योगाचा पत्ता नाही. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारांची संख्या वाढत असून, स्थानिक युवकांना रोजगारांसाठी भटकंती करावी लागत आहे.

उभ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता

देवरी : रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अतिक्रमणांची समस्या वाढली आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक

खातिया : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे केव्हाही मोठा धोका होवू शकतो.