शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

ग्रामीण कारागिरांवर उपासमारीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:39 IST

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा नवेगावबांध : वन्यप्राण्यांनी शेतशिवार व गावात शिरकाव करून मनुष्य व पाळीव प्राण्यांना जखमी करणे किंवा ठार ...

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा

नवेगावबांध : वन्यप्राण्यांनी शेतशिवार व गावात शिरकाव करून मनुष्य व पाळीव प्राण्यांना जखमी करणे किंवा ठार करणे सुरू केले आहे. या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर

गोंदिया : येथील रेल्वे स्थानकालगत प्रभू रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. कित्येकदा त्यातून दुर्गंध पसरतो. त्यामुळे या परिसरात घाणच घाण पसरून दुर्गंधीयुक्त वातावरण तयार होते.

वातावरणातील बदलामुळे भीती

गोंदिया : कोरोना विषाणू महामारीचे संकट डोक्यावर घोंगावत असतानाच, अचानक होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप व डोकेदुखीसारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे. यामुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे सावट आहे. कोरोनामुळे नागरिक अगोदरच घाबरलेले आहेत. त्यात सर्दी, खोकला किंवा ताप आल्यास नागरिक कोरोनाची धास्ती घेत आहेत. जिल्ह्यात आता कोरोना नियंत्रणात असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे.

‘गृहभेट आपुलकीची’ संकल्पना अंमलात

अर्जुनी मोरगाव : कोरोनामुळे घराबाहेर पडू शकत नसलेल्या वृद्ध व दिव्यांगांना विशेष साहाय्य योजनेचा लाभ मिळवून देता यावा, यासाठी ‘गृहभेट आपुलकीची’ ही संकल्पना अंमलात आणली जात आहे.

बस स्थानके ठरत आहेत शोभेची वास्तू

गोरेगाव ­: शहरात १०-१२ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून बस स्थानकांची निर्मिती करण्यात आली. या बस स्थानकावर आजघडीला कुणीही कर्मचारी राहत नाहीत, तसेच गोरेगावमार्गे जाणाऱ्या बस या स्थानकावर थांबत नाही. त्यामुळे बस स्थानकावर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात बस स्थानकाची बांधणी झाल्यावर बऱ्याच दिवसांनी बसथांबा होता, पण आजघडीला या स्थानकावर बसचा थांबा नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून बांधलेला प्रवासी निवारा शोभेची वास्तू ठरत आहे.

दिव्यांग-निराधारांवर उपासमारीची पाळी

परसवाडा : तिरोडा तालुक्यातील संजय गांधी, श्रावणबाळ, विधवांना, आर्थिक कुटुंब साहाय्यांना ४-५ महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. निराधारांची ना काम-ना पैसा अशी स्थिती झाली आहे.

उभ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता

देवरी : रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अतिक्रमणांची समस्या वाढली असून, रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे वाहने बाहेर काढणे कठीण होत आहे.

तंटामुक्त समितींचे तंट्यांकडे झाले दुर्लक्ष

गोंदिया : शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गावमोहीम सुरू केली. याअंतर्गत तंटामुक्त घोषित झालेल्या गावांना शासनाने बक्षीसरूपात रक्कम दिली. मात्र, गाव तंटामुक्त झाले व बक्षिसांची रक्कम मिळाल्यानंतर समित्यांनी तंट्यांकडे दुर्लक्ष आहे.

शिपाई भरतीची वयोमर्यादा वाढवा

आमगाव : मागील २-३ वर्षांपासून पोलीस शिपाई भरती प्रक्रिया झालेली नाही. भरतीसाठी वयोमर्यादा ३३ वर्षांवरून ३५ वर्षे करण्यात यावी, अशी मागणी बेरोजगार तरुणांनी केली आहे.

मजुरी वाढल्याने शेतकरी अडचणीत

गोंदिया : जिल्ह्यात सध्या धान कापणी व मळणीला जोर आला आहे. त्यामुळे शेतकरी मजुरांच्या शोधात आहे. मात्र, मजुरी वाढविण्यात आल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

बेरोजगारांच्या हाताला काम द्या

अर्जुनी-मोरगाव : तालुक्यात मोठ्या उद्योगाचा पत्ता नाही. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारांची संख्या वाढत असून, स्थानिक युवकांना रोजगारांसाठी भटकंती करावी लागत आहे.

घाटकुरोडा- देव्हाडा रस्ता उखडला

मुंडीकोटा : जवळील ग्राम घाटकुरोडा ते देव्हाडा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना या रस्त्याने ये-जा करणे त्रासदायक ठरत आहे.

राइस मील ठरत आहेत धोकादायक

गोरेगाव : राज्य मार्गावर असलेल्या राइस मीलमुळे वाहन चालकांच्या डोळ्यात धानाचा कोंडा उडत आहे. त्यामुळे डोळ्यात कचरा जाऊन वाहन चालकांचा अपघात होण्याची शक्यता असते. रस्त्यावरील राइस मील बंद करण्याची मागणी होत आहे.

नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी

अर्जुनी-मोरगाव : सांडपाण्याचा निचरा होत नाही, पण अजूनही नगरपंचायत प्रशासनाचे नाली स्वच्छतेकडे दुर्लक्ष आहे. नाल्या केरकचऱ्याने भरल्या आहेत. त्यातून सांडपाण्याचा निचरा होत नाही. नाल्यांची स्वच्छता करण्याची मागणी आहे. नगरपंचायत प्रशासन आणि नगरसेवकांनी लक्ष देण्याची गरज आहे.

सुरक्षा कवचाविना डीपी धोकादायक

गोंदिया : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रदूषण रोखण्यास मंडळाचे दुर्लक्ष

आमगाव : वाहनांना कर्णकर्कश प्रेशर हॉर्न लावण्यासाठी आणि भर रस्त्यावर वाजविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. प्रेशर हॉर्न वापरणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई होत नाही. ध्वनिप्रदूषणात वाढ झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

डासांच्या प्रादुर्भावाने गावकरी त्रस्त

गोंदिया : डासांची उत्पत्ती होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने डासांची संख्या वाढली आहे. याचा परिणाम जनतेच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे डासांचे निर्मूलन करणे गरजेचे आहे. हिवतापसारख्या आजाराची शक्यता आहे.