शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

शेकडो एकरातील धान रोवणी खोळंबली

By admin | Updated: August 24, 2016 00:07 IST

परिसरातील २०-२५ गावांमध्ये मागील गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या सरी बसरल्याच नाही. वरुणराजाच्या अवकृपेने बळीराजा मात्र

बोंडगावदेवी : परिसरातील २०-२५ गावांमध्ये मागील गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या सरी बसरल्याच नाही. वरुणराजाच्या अवकृपेने बळीराजा मात्र अस्मानी संकटात सापडलेल्या स्थितीत दिसत आहे. पावसाचा एक थेंब न आल्याने परिसरातील शेकडो एकरातील धानाची रोवणीच झाली नाही, अशी विदारक स्थिती आज सर्वत्र दिसत आहे.परिसरातील निमगाव, अरततोंडी, सिलेझरी, घुसोबाटोला, विहिरगाव, बोंडगावदेवी, चान्ना, देऊळगाव, सिल्ली (रिठी) बोदरा, बाक्टी, खांबी, पिंपळगाव, सरांडी (रिठी) चापटी, इंझोरी, सोमलपूर आदी गावांमध्ये जलसिंचनाच्या सोयींचा अभाव आहे. सदर गावशिवारात मोठ्या जलाशयाच्या पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. काही गावांत आजही मालगूजारी, मोठे तलाव, माजी मालगूजार तलाव आहेत. परंतु यावर्षीच्या हंगामात पावसाने एकदाही दमदार हजेरी लावली नसल्याने तलावात पाण्याचा साठा झालेला दिसत नाही. निसर्गाने अवकृपा दाखविल्याने आजघडीला सिल्ली (रिठी) तसेच इतर ठिकाणातील शेकडो एकराच्यावर जमिनी पडीक अवस्थेत आहेत. पाण्याच्या अभावाने धानाची रोवणी आजपावेतो झालेली नाही. तुरकळ पावसाने झालेले रोवणे पाण्याअभावी मरणास्तव झालेले दिसत आहेत. दमट वातावरणाने अळीचा प्रकोप वाढलेला दिसत आहे. परिसरातील बळीराजा येणाऱ्या दिवसात पाण्याची प्रतिक्षा करताना दिसतो. परंतु सकाळच्या प्रहरी निराश होतो. आज शेतकरी वर्ग फार आर्थिक संकटात सापडला असताना परिसरातील लोकप्रतिनिधी शांत बसलेले दिसतात. दमदार पावसाने हजेरी न लावल्यामुळे परिसरात ठिकठिकाणी धानाची रोवणी खोळंबलेली दिसत आहे. शेतात मर-मर राबणारा बळीराजा आज निराश होऊन चिंतामग्न दिसत आहे. (वार्ताहर)विहिरीमध्ये पाण्याचा ठणठणाटजवळील ग्राम घुसोबाटोला येथील गावातील विहिरी भर पावसाळ्यात कोरड्याच असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या ग्रामवासीयांसमोर उभी झाली आहे. घुसोबाटोला हे गाव सिलेझरी गट ग्रामपंचायतमध्ये येते. पहाडी भागावर वसलेल्या गावात बऱ्याच घरांमध्ये खाजगी विहिरी आहेत. ५० ते ६० फुट खोलीच्या विहिरी असताना सुद्धा आजघडीला विहिरीमध्ये पाण्याचा ठणठणाट दिसत आहे. घरच्या विहिरींना भर पावसाळ्यात पाणी नसल्यामुळे ग्रामस्थांसमोर पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली दिसत आहे. ग्रामपंचायतच्यावतीने गावात बोअरवेलची व्यवस्था आहे. मोजक्या साधनाअभावी घुसोबाटोलावासीयांना पिण्याच्या पाण्यासाठी कमालीची पायपीट करावी लागत आहे. परिसरात दमदार पावसाने एकदारी हजेरी लावली नसल्याने गावाशेजारील तळ्या-बोळ्यांमध्ये पाणी दिसत नाही. घरगुती विहिरीमध्ये एैन पावसाच्या दिवसात पाण्याचा बुंद संग्रहीत न झाल्याने पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण झाल्याची परिस्थिती गावात दिसून येत आहे.