शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

दीड लाखाच्या दारूच्या साठ्यासह ५ लाख ६१ हजारांचा माल पकडला

By admin | Updated: October 15, 2014 23:19 IST

मतदारांना वाटप करण्यासाठी गड्डाटोलीच्या गोदामात लपवून ठेवलेली दारू भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई मंगळवारच्या रात्री १० वाजता दरम्यान करण्यात आली आहे.

गोंदिया : मतदारांना वाटप करण्यासाठी गड्डाटोलीच्या गोदामात लपवून ठेवलेली दारू भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई मंगळवारच्या रात्री १० वाजता दरम्यान करण्यात आली आहे.मतदारांना वाटप करण्यासाठी आणलेली देशी विदेशी दारू गड्डाटोलीच्या मार्टीन चाळ येथील गोदामाच्या दोन खोल्यांमध्ये लपवून ठेवली होती. या गोदामातून काही जणांची ये-जा त्या ठिकाणावरून सुरू असताना याची भनक पोलीस सहाय्यक निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांना लागताच त्यांनी भरारी पथकला घेऊन त्या ठिकाणी धाड मारली.त्या ठिकाणातून १८० मिलीचे १८३८ देशी दारूचे पव्वे किंमत ५० हजार ८१६ रूपये व १८० म्लिीचे ४८० नग विदेशी दारू मॅकडाल न.१,व्हीस्की किंमत ६२ हजार ४०० या गोदामातून जप्त करण्यात आले. या गोदामात पाच व्यक्ती होते त्यांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अटक करण्यत आलेल्या आरोपींमध्ये सैय्यद मुबारक सैय्यद अकबर (२७) रा. बनिया मोहल्ला आमगाव, संतोष सत्यनरायण राव (२६) रा. गोंडीटोला कुडावा, सादाब सलीम शेख (१९) रा. रेल्वे क्वार्टर रााजलक्षमी कॉम्प्लेक्स जवळ गोंदिया, रूपेश श्रावण कांबळे (५०) रा. फुलचूर व देवराव हगरू रहांगडाले (६०) रा. पुरगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्या आरोपींजवळून एक कार व दोन मोटारसायकल पकडण्यत आले आहेत. एम.एच.३५/वाय ०४९५ किंमत २० हजार रूपये, एम.एच.३५/आर ५८९७ किंमत २० हजार रूपये, इंडिका व्हिस्टा कार एम.एच.३५/पी ३८६६ किंमत ४ लाख रूपये असा एकूण पाच लाख ६१ हजार २१६ रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. भरारी पथकाला व पोलिसांना य आरोपींच्या हालचालीत संशयस्पद वाटल्याने त्यानी त्यांचा पाठलाग करून मुद्देमाल पकडला. अंधार असल्यामुळे बॅटरीच्या उजेडात त्यांनी सहित्याची पाहणी केली. सदर आरोपींवर मुंबई दारूबंदी कयदा कलम ६५ ई अ अन्वये गुन्हा दखल केला आहे. सदर कारवाई जिल्हा उद्योग केंद्राचे निरीक्षक भुमेश्वर महादेव शिवणकर, रामनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले, हवालदार कैलास अंबुले, पोलीस नायक मुकेश शेंडे यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)