शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्यावर अवकळा

By admin | Updated: August 26, 2014 00:03 IST

वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचे पूजन करण्याचा आणि सर्वांच्या पोषिंद्या असलेल्या शेतकऱ्यांच्या सन्मानाचा दिवस असलेला पोळा सोमवारी जिल्ह्यात सर्वत्र शांततेत पार पडला.

शेतकऱ्यांच्या उत्साहावर विरजण : शहरात पूजेसाठीही बैल मिळेनागोंदिया : वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांचे पूजन करण्याचा आणि सर्वांच्या पोषिंद्या असलेल्या शेतकऱ्यांच्या सन्मानाचा दिवस असलेला पोळा सोमवारी जिल्ह्यात सर्वत्र शांततेत पार पडला. मात्र पोळ्यातील उत्साह दिवसेंदिवस कमी होत असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. शहरी भागात तर पुजेसाठीही बैलजोडी दिसत नसल्याने बैलांसाठी तयार केलेले नैवेद्य अनेकांना तसेच ठेवावे लागले.गोंदिया शहरात तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या जिल्हा न्यायालयाकडील बोळीत छोटेखानी पोळा भरतो. याशिवाय गोविंदपूर, फूलचूर, कुडवा या भागातही पोळा भरविला जातो. परंतू दरवर्षी दिसणारा उत्साह यावर्षी फारशा प्रमाणात दिसला नाही. त्यामुळे उत्कृष्ट बैलजोडीसाठी असलेली स्पर्धा, झडत्या यांचीही कमतरता यावेळी जाणवली. केवळ औपचारिकता पूर्ण करण्यापुरताच आता पोळा शिल्लक राहिला की काय, असे वातावरण पोळ्यातील हा निरुत्साह पाहून जाणवत होते.गोंदियात तहसील कार्यालयाच्या परिसरात या निमित्ताने लागणारी मुलांची खेळणी, फुगे विक्रेत्यांची धावपळ मात्र दिसत होती. एरवी प्रत्यक्ष बैल पाहणे दुरापास्त झालेल्या आपल्या मुलांना पोळ्याच्या निमित्ताने सजलेले बैल दाखविण्यासाठी अनेक पालक येथे येत असतात. त्यामुळे फुगे व खेळणी विक्रेत्यांचा धंदा चांगला होतो. मुलांमधील हा उत्साह यावर्षीही दिसत होता. परंतू काही वेळासाठी येथे भरलेल्या पोळ्यात मोजक्याच बैलजोड्या आल्या होत्या. त्या सुद्धा लवकरच तेथून दिसेनास्या झाल्यामुळे अनेकांना बैलजोडीचे दर्शनही घेता आले नाही. पोळा फुटल्यानंतर शेतकरी घरोघरी आपल्या बैलांना फिरवितात. त्या निमित्ताने महिला त्यांची पुजा करून नैवेद्य चारतात. पण अनेकांना बैलाची वाट पाहावी लागत होती.ग्रामीण भागात थोडाफार उत्साह दिसून आला. परंतू अनेकांकडे बैलजोड्यात आता राहिलेल्या नसल्यामुळे पोळ्यातून दिवसेंदिवस बैलांची संख्याही कमी होत असल्याचे दिसून आले. पूर्वी प्रत्येक घरी बैलजोड्या असायच्या. या बैलांच्या माध्यमातूनच शेतीच्या मशागतीसह सर्व कामे केली जात होती. परंतू आता अनेक शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आले आहेत. ट्रॅक्टरनेच मशागत होत असल्यामुळे बैल पोसण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत नाही. यामुळे पोळ्याचा उत्साह कमी झाला असला तरी शेतकऱ्यांचा सण म्हणून ग्रामीण भागात या सणाच्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्या जात असल्याचे दिसून आले. (जिल्हा प्रतिनिधी)