शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कर्कश आवाजावर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 21:28 IST

मिरवणूक म्हटली की डिजे, ढोल, तासे यांचा गजर केला जातो. परंतु यंदा ५० डेसीबल पेक्षा जास्त आवाज नको व गणपती उत्सव आनंदातून साजरा करावा असे ठरविण्यात आले आहे. मिरवणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून वाचणारे पैसे समाजातील गरजूंना देण्याचा उपक्रम गणेश उत्सव मंडळांच्या सदस्यांनी सुरू करायला हवा अशा प्रतिक्रीया उमटत आहेत.

ठळक मुद्देशांततेसाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज : अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मदत करा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मिरवणूक म्हटली की डिजे, ढोल, तासे यांचा गजर केला जातो. परंतु यंदा ५० डेसीबल पेक्षा जास्त आवाज नको व गणपती उत्सव आनंदातून साजरा करावा असे ठरविण्यात आले आहे. मिरवणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून वाचणारे पैसे समाजातील गरजूंना देण्याचा उपक्रम गणेश उत्सव मंडळांच्या सदस्यांनी सुरू करायला हवा अशा प्रतिक्रीया उमटत आहेत.शासनाने डिजेच्या आवाजासाठी मुभा द्यावी, अशी गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांची नेहमीच मागणी असते. मात्र सर्व मंडळांनी सायलेन्स झोन मध्ये कर्कश आवाज करू नये, मंदीर, मस्जीद, रूग्णालय या परिसरात कर्कश आवाज करू नये, मिरणूक काढतांना वाहतुकीचे नियम पाळावे, इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच गणेश मंडळांनी आपल्या मंडळांचा आदर्श समाजासमोर उभा राहील असे काम करावे. गणेशोत्सव साजरा करतांना कर्णकर्कश वाद्य वाजवू नये, ५० डेसीबलपेक्षा अधिक आवाज असू नये यासाठी पोलीस अधिक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन व गणेश मंडळे एकत्र येऊन शांततेने काम करणार आहेत.विसर्जन करताना पाण्यात मौज-मस्ती करू नयेडिजेवर अश्लील गाणे वाजविणे टाळावे, भक्तीभाव असावा, गुलाल उधळणे बंद करावे, गणेश विसर्जन मिरवणुकीत शक्ती प्रदर्शन नसावे. मिरवणूक काढताना उत्सव मंडळाच्या लोकांनी रस्त्यावरून ये-या करणाऱ्यांचा विचार करून त्यांच्यासाठी जागा सोडावी. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. तसेच विसर्जन करताना पाण्यात मस्ती करणे टाळावे असे ही कळविण्यात आले आहे.१४ संवेदनशील ठिकाणांमध्ये सडक-अर्जुनीगणेशोत्सवात जातीय जंगल महाराष्ट्रात यापूर्वी घडल्या आहेत. राज्यात जातीय दंगल होणाºया १४ संवेदनशील ठिकाणांपैकी सडक-अर्जुनी हे एक ठिकाण असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. परंतु महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेने दंगलीने धगधगणाऱ्या सडक-अर्जुनी या गावाला शांत केले. तरीही या गावाकडे शासनाचे लक्ष असते. एकेकाळी गणेशोत्सवादरम्यान हिंदू-मुस्लिमांची भांडणे येथे व्हायची. परंतु महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने या गावातील लोकांची बैठक घेऊन समन्वय घडवून आणल्याने हे गाव आता शांततेच्या मार्गावर आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८