शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मानवी हस्तक्षेपामुळे करकोचाचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:20 IST

संतोष बुकावन अर्जुनी मोरगाव : नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरात बहुसंख्येने दिसणाऱ्या उघड्या चोचीचा करकोचांची संख्या हल्ली रोडावलेली दिसून ...

संतोष बुकावन

अर्जुनी मोरगाव : नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरात बहुसंख्येने दिसणाऱ्या उघड्या चोचीचा करकोचांची संख्या हल्ली रोडावलेली दिसून येत आहे. करकोचा व इतर पक्ष्यांच्या खाद्यांना मानवाने आपले खाद्यान्न बनविल्याने पक्षी पाठ फिरवत आहेत. प्रकृती नेचर फाउंडेशनने यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.

नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान वसाहत संकुल परिसरात निसर्गरम्य तलाव आहे. हा तलाव विस्तीर्ण आहे. तलावाच्या काठावर अनेक गावे वसली आहेत. तलावात विविध प्रकारच्या वनस्पती व जैवविविधतेच्या आकर्षणामुळे देशी व विदेशी पक्षी येथे मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळेच या तलावाची "पक्ष्यांचे माहेरघर" म्हणून सर्वदूर ओळख आहे. हिवाळ्यात येथे दरवर्षी सुमारे चार महिने विदेशी पक्षी मोठ्या संख्येने हमखास दिसून येतात. तलाव व लगतच्या अधिवासात करकोचा पक्ष्यांचे कवचयुक्त गोगलगाय (ग्रामीण भाषेत घोगोला) हे खाद्य मुबलक प्रमाणात आहेत. हे या पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे. त्यामुळे या पक्ष्याला घोघोलेफोड या नावाने स्थानिक परिसरात ओळखले जाते. या खाद्याच्या आकर्षणामुळे करकोचा पक्ष्यांची संख्या या तलावावर मोठ्या प्रमाणात दिसून येत होती. परंतु मानवी हस्तक्षेपामुळे नवेगाव बांध परिसरातील लोक भाजी बनविण्याकरिता घोघोले जमा करतात. यामुळे दिवसेंदिवस खाद्य अपुरे पडल्यामुळे उघड्या चोचीचा करकोचा हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे जैवविविधतेने नटलेला निसर्गरम्य परिसर आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्षी दरवर्षी येतात. या विविध प्रजातींच्या पक्ष्यांना बघण्याकरिता आणि त्यांचा अभ्यास करण्याकरिता अनेक पर्यटक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने येतात. या परिसरात करकोचा पक्ष्यांची घरटी मानवी हस्तक्षेपामुळे दिसेनाशी झाली आहेत. येथील स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत सुद्धा अलीकडे घट झाल्याचे दिसून आले आहे. जैवविविधता आणि नवेगाव बांधच्या समृद्धीमध्ये या पक्ष्याचे मोलाचे योगदान आहे. या पक्ष्यांच्या संख्येत होणारी घट बघता या पक्ष्याचे अस्तित्व नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

..................

संवर्धनासाठी एक पाऊल.....

उघड्या चोचीचा करकोचा हे पक्षी नवेगाव बांधच्या तलावावर मोठ्या संख्येत दिसून येत होते. हल्ली त्यांची संख्या रोडावली आहे. मानवी हस्तक्षेपामुळे त्यांच्या खाद्यावर आक्रमण होत असल्याने काळाच्या ओघात हा पक्षी नामशेष होण्याची भीती आहे. या पक्ष्याचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने घोघोले जमा करणाऱ्या लोकांवर वेळीच बंधने घालणे आवश्यक आहे. यासंदर्भात वन विभागाचे अधिकारी विजय धांडे, वाघ, दादा राऊत यांना प्रकृती नेचर फाउंडेशनने निवेदन दिले आहे. फाउंडेशनतर्फे नवेगाव बांध,धाबेपवनी, कोहलगाव ग्रामपंचायत तसेच मत्स्य व्यवसाय संस्थांना निवेदन देण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे डॉ. गोपाल पालिवाल, डॉ. शरद मेश्राम, प्रा. अजय राऊत व बाळकृष्ण कुंभरे उपस्थित होते. फाउंडेशनने करकोचा संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

===Photopath===

300621\img-20210629-wa0020.jpg

===Caption===

करकोचा पक्षी व चोचीत खाद्य